एक्स्प्लोर
LGचा जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन X Cam लाँच, किंमत रु. 21,500
मुंबई: LGनं आपला नवा स्मार्टफोन LG X cam नुकतंच लाँच केला आहे. हा नवा स्मार्टफोन रु. 21,500 उपलब्ध आहे. कंपनीनं आपल्या वेबसाईटवर हा फोन लिस्ट केला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे त्याचा ड्यूल कॅमेरा.
LG X cam स्मार्टफोनचे खास फीचर्स:
या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंच फूल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रेझ्युलेशन 1920x1080 पिक्सल आहे. यामध्ये 1.14GHz
ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये 2 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच 16 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून 2 टीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
कॅमेरा ही या स्मार्टफोनची खासियत आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल स्टॅण्डर्ड आणि 5 मेगापिक्सलचा वाइड अँगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
यामध्ये 4जी एलईटी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि यूएसबी सारखे फीचर देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement