LG Ultra Tab Launch: दक्षिण कोरियाची कंपनी LG ने आपला नवीन LG Ultra Tab लॉन्च केला आहे. कंपनीने सध्या हा टॅब फक्त देशांतर्गत बाजारात लॉन्च केला आहे. हा टॅब Android 12 वर आधारित आहे. या टॅबमध्ये 10.35 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. एलजी अल्ट्रा टॅबमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह 7040 mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे. या टॅबमध्ये चार ऑडिओ स्पीकर उपलब्ध आहेत, जे वॅकॉम स्टायलस सपोर्टसह येतात. तसेच टॅबमध्ये चांगले फ्रंट आणि रियर कॅमेरे देखील दिसतात. या टॅबच्या इतर फीचर्सबद्दल आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.


एलजी अल्ट्रा टॅबचे स्पेसिफिकेशन 



  • LG अल्ट्रा टॅब Android 12 वर काम करतो.

  • LG अल्ट्रा टॅबमध्ये 10.35-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. 60Hz रिफ्रेश रेट आणि 2000x1200 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो.

  • LG अल्ट्रा टॅबला स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह 4 GB RAM + 64 GB स्टोरेज मिळते. याची रॅम मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.

  • एलजी अल्ट्रा टॅबमध्ये 8 एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी, टॅबमध्ये 5 एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

  • वॅकॉम स्टायलस सपोर्टसह येणाऱ्या LG अल्ट्रा टॅबमध्ये चार ऑडिओ स्पीकर आहेत.

  • कंपनीने दावा केला आहे की, या टॅबमध्ये यूएस आर्मीचे MIL-STD 810G स्टॅंडर्ड रेटिंग आहे.

  • LG अल्ट्रा टॅबमध्ये 7,040mAh बॅटरी मिळते. जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.


किंमत 


एलजी अल्ट्रा टॅबलेट कंपनीच्या कोरियन वेबसाइटवर सिंगर चारकोल ग्रे कलरमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. टॅब्लेटच्या 64 GB स्टोरेजसह 4 GB RAM ची किंमत 4,26,000 कोरियन वॉन (भारतीय चलनात अंदाजे 26,000 रुपये) आहे.


महत्वाच्या बातम्या :