Xiaomi New Operating System : मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi च्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम (OS) MIUI 14 बद्दल माहिती लीक झाली आहे. ही नवीनतम Android आधारित OS कंपनी यावर्षी रिलीज करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, MIUI 14 Android 13 वर आधारित असू शकतो. यामध्ये यूजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी Andi-Fraud Protection फीचर देखील समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, MIUI 14 ला सपोर्ट करणार्या स्मार्टफोनची माहितीही समोर आली आहे. या नवीन OS मध्ये कोणती वैशिष्ट्ये उपलब्ध होणार आहेत याची माहिती जाणून घ्या.
MIUI 14 मध्ये काय असेल खास?
MyDrivers च्या लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Xiaomi लवकरच त्याचा नवीन MIUI 14 लॉन्च करू शकते. कंपनीने गेल्या वर्षीच MIUI 12.5 व्हर्जन लॉन्च केले होते. परंतु, आता कंपनी MIUI 13 ऐवजी थेट MIUI 14 बाजारात आणण्याची तयारी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे एंड-फ्रॉड प्रोटेक्शन फीचर तसेच ब्लूटूथ LE सह जोडले जाऊ शकते. नवीन OS ला उच्च वारंवारता कोडेक आणि Auracast ब्रॉडकास्टिंगसाठी समर्थन देखील मिळू शकते, जे FM रेडिओ आणखी चांगले बनवण्यासाठी कार्य करते. यासोबतच Xiaomi गॅलरी अॅप, असिस्टंट इंटरफेस आणि क्लॉक अॅपमध्येही बदल पाहिले जाऊ शकतात.
या स्मार्टफोन्समध्ये MIUI 14 उपलब्ध असणार
मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, MIUI 14 ला सपोर्ट करणार्या स्मार्टफोन्सची यादी देखील जारी करण्यात आली आहे. Xiaomi Mi 11 सीरिजमधील MIUI 14, Xiaomi Mi 10 सीरिज, Redmi Note 9 सीरिज, Xiaomi Mi MIX 4, Mi 10 सीरिज, Redmi Note 11, Redmi Note 10, Redmi K50, Redmi K40, Redmi K30 तसेच इतर काही स्मार्टफोन असू शकतात.
महत्वाच्या बातम्या :