एक्स्प्लोर
लेनोव्हो Z2 प्लस स्मार्टफोनवर खास ऑफर
मुंबई: लेनोव्होचा Z2 प्लस फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या 3जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरी मॉडेलची किंमत 17,999 रु. आहे.
तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी मॉडेलची किंमत 19,999 रु. आहे. लेनोव्होनं आपल्या झेड सीरीजमधील हा स्मार्टफोन मागील आठवड्यात लाँच केला होता.
या स्मार्टफोन खासियत म्हणजे, याचा दमदार प्रोसेसर. याचा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आहे. या मध्ये फूल एचडी स्क्रीनही देण्यात आली आहे. तसंच यामध्ये 3500 mAh पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच अँड्रॉईड मार्शमेलो सिस्टिमवर हा स्मार्टफोन आधारित आहे. लेनोव्हो या स्मार्टफोनवर काही खास ऑफरही देत आहे. यात्राडॉटकॉमवर हा स्मार्टफोन बूक केल्यास 15,000 पर्यंत कॅशबॅक मिळेल. तर याशिवाय किंडल ई-बूक्सवर 500 रुपयांच्या खरेदीवर 80% सूट मिळेल. या सर्व ऑफर 3 ऑक्टोबरपर्यंत असणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement