एक्स्प्लोर
LeEco च्या सुपरफोननं घातली ग्राहकांना भुरळ!
मुंबई: चीनमधील टेक कंपनी LeEco ने सुपरफोन आणि सुपरटेनमेंट मिळून एक खास मॉडेल तयार केलं आहे. "LeEco देशातील एकमेव कंपनी आहे, ज्यांनी सुपरफोन कंटेट मॉडेल क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे आणि स्मार्टफोन उद्योगातील स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे." असं या कंपनीचं म्हणणं आहे.
LeEco चं चॅनेल हे एक विशिष्ट मॉडेल आहे. जिथें कंटेटला मोबाइल, टॅबलेट, कंम्प्युटर, स्मार्ट टीव्ही, सिनेमागृहमध्येही पाहता आणि सिंक्रोनाइज्ड तसेच शेअरही करता येईल.
कंपनी 2016पर्यंत देशातील 10 शहरांमध्ये इन-हाउस कंटेंट डिलिवरी नेटवर्क्स (सीडीएन) स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
कंपनी क्लाउड सर्विस स्थापन करण्यावरही एक कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ज्यामुळे सीडीएन कंटेंट जलद वितरणास मदत होईल.
LeEcoचा सुपरफोन Le2 आणि Max2ला देशातील पहिल्याच फ्लॅश सेलमध्ये एकलाखाहून अधिक नोंदणी करण्यात आली आहे.
फ्लॅश सेल 28 जून फ्लिपकार्ट आणि लेमॉलवर असणार आहे. लेमॉल ही शॉपिंग वेबसाइट असून ती नुकतीच लाँच करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement