एक्स्प्लोर
Advertisement
LeEcoच्या Le मॅक्स 2 स्मार्टफोनवर तब्बल 5000 रुपयांपर्यंत सूट!
मुंबई: मोबाइल कंपनी LeEcoनं Le मॅक्स 2 स्मार्टफोनवर एक खास ऑफर दिला आहे. LeMall वर हा स्मार्टफोन 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान रु. 17,999 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या ऑफरची माहिती LeEco इंडियानं ट्विटरवरुन दिली आहे. लाँचिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत तब्बल 22,999 रु. एवढी होती.
हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटवर Big Billion days सेलवर देखील स्पेशल ऑफरमध्ये 2 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे.
अॅमेझॉनवर 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर आणि स्नॅपडीलवर 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत स्पेशल ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे.
Le मॅक्स 2 स्मार्टफोनचे खास फीचर: 5.7 फूल एचडी स्क्रीन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर 4जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी 21 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो ओएस 3100 mAh बॅटरी क्षमता LeEcoचं 30 सप्टेंबरला LeMall वर एक फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. या फ्लॅश सेलमध्ये सहभागी होणाऱ्या 2000 जणांना स्पेशल वॉउचर देण्यात येणार आहेत.The unexpected moment is always sweeter. Le Max2 now at Rs. 17,999! #Superfans, you know what you have to do. #CelebrateLeMax2 pic.twitter.com/y0x7DCMyv1
— LeEco India (@LeEcoIndia) September 27, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
करमणूक
क्रिकेट
Advertisement