एक्स्प्लोर
जिओ-एअरटेल आमनेसामने, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या ऑफर!
एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांनी आपल्या 4G स्मार्टफोनवर नवी कॅशबॅक ऑफर आणली आहे.
![जिओ-एअरटेल आमनेसामने, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या ऑफर! jio vs airtel new cashback offers for users latest update जिओ-एअरटेल आमनेसामने, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या ऑफर!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/23114652/cashback-offer.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांनी आपल्या 4G स्मार्टफोनवर नवी कॅशबॅक ऑफर आणली आहे. दोन्ही कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास कॅशबॅक ऑफर आणली आहे.
एअरटेल कॅशबॅक ऑफर :
एअरटेलने HMD ग्लोबलसोबत भागीदारी करुन नोकियाच्या स्मार्टफोनवर कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. एअरटेल आपल्या प्रीपेड ग्राहकांना नोकिया 2 आणि नोकिया 3 स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 2,000 रुपये कॅशबॅक देणार आहे. नोकिया 2 ची किंमत 6,999 रुपये आहे. पण या ऑफरमुळे हा स्मार्टफोन आता ग्राहकांना फक्त 4,999 रुपयात मिळू शकतो. तर नोकिया 3 ची किंमत 9,499 रुपये आहे. पण आता हा स्मार्टफोन 7,499 रुपयात खरेदी करता येईल.
या कॅशबॅकसाठी एअरटेल मात्र एक अट ठेवली आहे. या स्मार्टफोनसोबत ग्राहकांना एअरटेलचा 169 रुपयांचा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी 4 जीबी डेटा आणि अनलिमिटेड एसटीडी कॉलिंग मिळणार आहे. 2000 रुपयांचं कॅशबॅक एअरटेल वॉलेटमध्ये 36 महिन्यात दोन टप्प्यात दिले जातील.
ग्राहकांना 18 महिन्यात कमीत कमी 3500 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल. ज्यामध्ये पहिलं कॅशबॅक 1000 रुपये असेल याशिवाय 19 व्या महिन्यापासून 36 महिन्यापर्यंत 3500 रुपयांच्या रिचार्जवर 1000 रुपयांचं दुसरं कॅशबॅक मिळेल.
अशा पद्धतीने एकूण 2000 रुपये कॅशबॅक ग्राहकांना मिळणार आहे.
जिओ फुटबॉल कॅशबॅक ऑफर :
जिओच्या या ऑफरमध्ये स्मार्टफोनवर 2200 रुपयांचं कॅशबॅक मिळणार आहे. खास गोष्ट म्हणजे हे कॅशबॅक तात्काळ असणार आहे. म्हणजेच कॅशबॅकसाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. 15 फेब्रुवारीपासून 31 मार्च 2018 पर्यंत यूजर्स जेव्हा नव्या स्मार्टफोनवर पहिल्यांदा 198/299 रुपयांचं रिचार्ज करतील तेव्हा त्यांच्या Myjio खात्यात 50 रुपयांचे 44 वाऊचर जमा होतील. पण ही ऑफर मिळवण्यासाठी यूजर्संना 15 फेब्रुवारी 2018 पासून 31 मार्च 2018 पर्यंत 198/299 रुपयांचं पहिलं रिचार्ज करणं अनिवार्य असणार आहे.
या नव्या स्मार्टफोनवर मिळणार जिओ फुटबॉल ऑफर
LYF, Samsung, Xiaomi, Motorola, Micromax, Huawei, Nokia, 10.or, Blackberry, Asus, Panasonic, LG, Intex, Alcatel, Comio, Jivi, Celkon, Swipe, Ziox, Zen, iVoomi, Centri
![nokia](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/23114656/nokia1.jpg)
![mi](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/23114654/mi.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)