एक्स्प्लोर

जिओ फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट नसणार!

या फीचरबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र अखेर हा फोन सिंगल सिम असेल, हे समोर आलं आहे.

मुंबई : रिलायन्स जिओच्या सर्वात मोठ्या फीचरबाबतचा सस्पेंस अखेर संपला आहे. या फोनमध्ये केवळ सिंगल सिम स्लॉट असेल, अशी माहिती समोर आली आहे. या फीचरबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र अखेर हा फोन सिंगल सिम असेल, हे समोर आलं आहे. रिलायन्स जिओचा मच अवेटेड व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोन लाँच करण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली. 24 ऑगस्टपासून या फोनची प्री बुकिंग करता येणार आहे. महिन्याला केवळ 153 रुपयांमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. मात्र केवळ 500 एमबीपर्यंतच हायस्पीड डेटा मिळेल, त्यानंतर स्पीड कमी होईल, अशी माहिती समोर आली आहे. 1500 रुपये अनामत रक्कम ठेवून हा फोन मोफत दिला जाणार आहे. मात्र असं असलं तरी या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअप यूझर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांना हा फोन निराश करु शकतो. मात्र या फोनमध्ये कंपनीचं जिओ चॅट हे अप येणार आहे. जिओचा फोन कसा बुक कराल? जिओ फोन 15 ऑगस्ट रोजी रोल आऊट होईल. मात्र या फोनचं प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून Myjio App वर किंवा रिलायन्स स्टोअरमध्ये जाऊन करता येईल. ‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या तत्वावर सप्टेंबरपासून या फोनची प्रत्यक्ष विक्री सुरु होईल. म्हणजेच जो ग्राहक अगोदर फोन बुक करेन, त्यालाच अगोदर फोन मिळेल. जिओ फोन कसा आहे? रिलायन्सने जिओप्रमाणे आज आणखी एक धमाका केला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे  हा फोन फुकटात मिळणार आहे. मात्र त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील. जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे. याशिवाय जिओने 153 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे.  जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. रिलायन्सची आज नवी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुकेश अंबानींनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यापैकी महत्त्वाची घोषणा म्हणजे रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोन. फीचर्स काय असतील? फीचर फोन हा जिओचा स्वस्त फोन असणार आहे. ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल. 512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, 2000mAh क्षमतेची बॅटरी, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील. संबंधित बातमी :

‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस

भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!

रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन

महत्त्वाच्या बातम्या

Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget