एक्स्प्लोर
जिओची धमाकेदार ऑफर, दोन नवे प्लॅन लाँच
जिओच्या डेटा क्रांतीनंतर टेलिकॉम सेक्टरमधील इतर कंपन्यांनी देखील नवनव्या ऑफर आणल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा जिओनं हाय स्पीड इंटरनेटचे नवे प्लॅन लाँच केल्या आहेत.
मुंबई : रिलायन्स जिओच्या एंट्रीनंतर अनेक टेलिकॉम कंपन्यांचे धाबे अक्षरश: दणाणणे होते. त्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनी अनेक नवनवे प्लॅन आणले होते. त्यामुळे आता जिओनं पुन्हा एकदा आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत.
जिओच्या डेटा क्रांतीनंतर टेलिकॉम सेक्टरमधील इतर कंपन्यांनी देखील नवनव्या ऑफर आणल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा जिओनं हाय स्पीड इंटरनेटचे नवे प्लॅन लाँच केल्या आहेत.
509 रुपयांच्या प्लॅन
जिओ वेबसाइटवरील माहितीनुसार, 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल, मेसेज आणि फ्री रोमिंग मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 98 जीबी डेटा मिळणार आहे. दोन जीबीपर्यंत हाय-स्पीड डेटा वापरल्यानंतर स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस होईल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 49 दिवसांसाठी असणार आहे.
799 रुपयांचा प्लॅन
जिओच्या 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगही असणार आहे. या प्लॅनमध्ये 84 जीबीपर्यंत डेटा मिळणार असून याची व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असणार आहे.
(नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement