एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
4जी स्पीडमध्ये रिलायन्स जिओ सर्वात शेवटच्या स्थानावर: ट्राय
![4जी स्पीडमध्ये रिलायन्स जिओ सर्वात शेवटच्या स्थानावर: ट्राय Jio Is Slowest 4g Service Reveals Trai Data 4जी स्पीडमध्ये रिलायन्स जिओ सर्वात शेवटच्या स्थानावर: ट्राय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21033210/reliancejio3-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: खऱ्याखुऱ्या 4G स्पीडसाठी तुम्ही रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. कारण ट्रायच्या वेबसाईटवर मंगळवारी प्रसिद्ध झालेल्यानं माहितीनं जिओचं पितळ उघडं पाडलं आहे.
एअरटेल, व्होडाफोन, आयडीया, अनिल अंबानींचे रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या नेटवर्कचा स्पीड जिओ 4G पेक्षा खूपच अधिक असल्याचं यात म्हणलं आहे. या वेबसाईटवर दिलेल्या माहिती नुसार एअरटेलच्या इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक म्हणजे 11.7 MBPS नोंदवला गेला. तर दुसऱ्या क्रमांकावर अनिल अंबानींचं रिलायन्स कम्युनिकेशन आहे.
जिओच्या तंत्रज्ञांनी मात्र ट्रायच्या चाचणीचे निकाल मानायला नकार दिला आहे. या चाचणीचे इतर नेटवर्कच्या तुलनेत प्रसिद्ध करण्यात आलेले निकाल पूर्वग्रह दूषित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 31 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंगची घोषणा करणाऱ्या जिओला इथंही ट्रायनं चाप लावला आहे. त्यामुळे जिओला केवळ 3 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंग सेवा देता येईल असा आदेश ट्रायनं दिला आहे. इतर स्पर्धक कंपन्यांनी रिलायन्स ट्रायच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याची तक्रार ट्रायकडे केली होती.
संबंधित बातम्या:
3 डिसेंबरपर्यंत जिओचं सिम घेणाऱ्यांनाच फ्री कॉलिंग ऑफर!
जिओची फ्री कॉलिंग सेवा फक्त 3 डिसेंबरपर्यंतच, ट्रायचे निर्देश
![तुम्हाला तुमच्या जुन्याच नंबरवर रिलायन्स 4G सेवेचा वापर करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर रिलायन्स जिओमध्ये पोर्ट करावा लागेल. यासाठी तुमच्या मेसेज बॉक्समध्ये PORT असे लिहून त्यापुढे तुमचा मोबाईल नंबर लिहावा, आणि हा मेसेज 1900 या नंबरवर पाठवावा.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/13184325/reliancejio4.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)