एक्स्प्लोर
खुशखबर! पुढचं एक वर्ष जिओची प्राईम ऑफर मोफत मिळणार
जिओच्या प्राईम युझर्सना आजपासून म्हणजे 31 मार्चपासून प्राईम ऑफर्सचा लाभ मिळत राहणार आहे. एका वर्षासाठी या मेंबरशीपची मुदत वाढवण्यात आली आहे.
![खुशखबर! पुढचं एक वर्ष जिओची प्राईम ऑफर मोफत मिळणार Jio extended prime membership validity till 31st March 2019 खुशखबर! पुढचं एक वर्ष जिओची प्राईम ऑफर मोफत मिळणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/22220902/jio-53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांना खास भेट दिली आहे. जिओच्या प्राईम युझर्सना आजपासून म्हणजे 31 मार्चपासून प्राईम ऑफर्सचा लाभ मिळत राहणार आहे. एका वर्षासाठी या मेंबरशीपची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या प्राईम मेंबर्सना पुढच्या वर्षीपर्यंत प्राईम ऑफरचे सर्व लाभ मिळत राहतील.
जिओची प्राईम मेंबरशीप घेण्यासाठी 99 रुपये मोजावे लागत होते. या ऑफरची मुदत 31 मार्च म्हणजे आज संपत होती. मात्र जिओने या ऑफरची मुदत वाढवत 31 मार्च 2019 केली आहे. तर जिओचे नवे युझर्स 99 रुपयांमध्ये प्राईम मेंबरशीप घेऊ शकतात.
31 मार्च 2018 रोजी जिओची प्राईम मेंबरशीप संपणार होती. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न प्रत्येक युझर्सच्या मनात होता. अखेर जिओने एक दिवस अगोदरच बोनांझा ऑफर देण्याची घोषणा केली.
प्राईम मेंबर्सना मिळणारे फायदे
जिओ प्राईम मेंबर्सना स्वस्त आणि स्पेशल टॅरिफ प्लॅन मिळतात
VoLTE सर्व्हिसमुळे मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा
जिओ अॅपचा लाभ
हे सर्व लाभ पुढच्या वर्षी म्हणजे 31 मार्च 2019 पर्यंत मिळणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)