एक्स्प्लोर

जिओ इफेक्ट : आयडिया, व्होडाफोन, एअरटेल यांच्यात ऑफर्सची चढाओढ

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने वेलकम ऑफर पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी वाढवल्यानंतर देशातील तिनही प्रमुख दूरसंचार कंपन्या आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेल यांची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. रिलायन्स जिओच्या 'हॅप्पी न्यू इयर' या ऑफरमुळे ग्राहकांना 31 मार्च 2017 पर्यंत अनलिमिटेड 4 G डेटा, मोफत व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगची सेवा मिळणार आहे. रिलायन्स जिओला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. त्यामुळे आता आपले ग्राहक कमी होऊ नयेत, यासाठी इतर कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. काय आहे व्होडाफोनची ऑफर? रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, आयडियानंतर आता वोडाफोनही फ्री सेवा देण्याच्या शर्यतीत सामील झालं आहे. वोडाफोननं देशभरात अनलिमिटेड फ्री कॉलिंग प्लान लाँच केला आहे. प्रीपेड यूजर्ससाठी 144 रुपयांच्या पॅकपासून सुरवात असणार आहे. या पॅकमध्ये देशभरात वोडाफोन टू वोडाफोन फ्री अनलिमिटेड कॉलिंग असणार आहे. तसेच 500 एमबी डेटाही मिळेल. या पॅकची व्हॅलिडेटी 28 दिवसांपर्यंत असणार आहे. तर 344 रुपयांच्या पॅकवर वोडाफोनच्या सर्व मोबाइल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल फ्री असणार आहे. तसेच नॅशनल रोमिंग फ्री असणार आहे. तसेच यूजर्सला 1 जीबी 4जी डेटा मिळेल. काय आहे एअरटेलची ऑफर? रिलायन्स जिओने आपल्या मोफत सेवेला ‘हॅप्पी न्यू ईयर ऑफर’च्या माध्यमातून मार्चपर्यंत वाढवल्याने आता एअरटेलनेही दोन नवे प्लॅन लाँच केले. या नव्या प्लॅननुसार 4G डेटासोबत अनलिमिटेड लोकल-एसटीडी व्हॉईस कॉल मिळणार आहेत. यामध्ये 145 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. एअरटेलच्या 145 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबी 4G डेटासोबत एयरटेल ते एअरटेल मोफत लोकल-एसटीडी व्हॉईस कॉलची सुविधा मिळेल. 345 रुपयांच्या प्लॅनमध्ये देशात कुठल्याही नेटवर्कवर मोफत लोकल-एसटीडी कॉलसोबत 1 जीबी 4G डेटा मिळेल. दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवस असेल आणि देशभरातील एअरटेलच्या ग्राहाकांसाठी हे प्लॅन उपलब्ध असतील. काय आहे आयडीयाची ऑफर? आयडीयानेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही खास प्लॅन आणले आहेत. आयडियाच्या 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल-एसटीडी व्हॉईस कॉलिंग, 5 GB 3 G डेटा आणि 3 हजार लोकल-एसटीडी एसएमएस मिळणार आहेत. यानंतर 1599 रुपयांचीही एक ऑफर लाँच केली आहे. यामध्ये अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंग, 10 GB 3 G डेटा आणि 3 हजार लोकल-एसटीडी एसएमएस मिळणार आहेत. संबंधित बातम्या :

नोटाबंदी, जिओच्या ऑफरमुळे दूरसंचार कंपन्यांची कमाई घटणार

वोडाफोनची 'डबल डेटा' ऑफर, दुप्पट डेटा मिळणार!

जिओला टक्कर देण्यासाठी एयरटेलचे दोन नवे प्लॅन

रिलायन्स जिओची मुंबईतील 833 काॅलेजना मोफत वायफाय सेवा

वोडाफोनचा फ्री अनलिमिटेड कॉल प्लान लाँच!

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget