एक्स्प्लोर

आजपासून या राज्यात Jio 5G सेवा होणार सुरू, आकाश अंबानी करणार लॉन्च

Reliance Jio 5G launch: रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी आज राजस्थानमध्ये 5G सेवा लॉन्च करणार आहेत. मात्र याचे कमर्शियल लॉन्च नंतर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Reliance Jio 5G launch: जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरातून 5G सेवा आणि Jio True 5G आधारित वाय-फाय सेवा सुरू लॉन्च केली आहे. चेन्नईमध्येही आज जिओ 5G सेवा लॉन्च करण्यात आली आहे.  यासह आता एकूण 6 शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू झाली आहे. याआधी जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. आता Jio True 5G सेवा 6 शहरांमध्ये उपलब्ध आहे. जिओच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आधीच माहिती दिली होती. आकाश अंबानी यांनी नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात Jio True 5G आणि Jio True 5G पॉवर्ड वाय-फाय सेवा सुरू केली आहे.

या शहरांमध्ये राहणाऱ्या युजर्सनाही जिओच्या वेलकम ऑफरचा लाभ मिळणार आहे. Jio ची 5G सेवा सध्या देशभरात उपलब्ध नसून टप्प्याटप्प्याने सेवेचा विस्तार केला जाणार आहे, असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानीही श्रीनाथजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यात 5जी सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले होते. 2015 मध्येही Jio 4G लॉन्च करण्यापूर्वी मुकेश अंबानी श्रीनाथजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

देशात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू करण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवा लॉन्च करण्यात आली. 5G लॉन्च करताना ते म्हणाले की, देशात आता ही सेवा सुरु झाली, सर्वांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. हे तंत्रज्ञान केवळ व्हॉईस कॉल किंवा व्हिडीओ पाहण्यापुरते मर्यादित राहू नये. याचा उपयोग क्रांती आणण्यासाठी व्हायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, नजीकच्या भविष्यात, देश अशा तंत्रज्ञानावर काम करेल ज्यामुळे भारताला जागतिक स्तरावर नेता येईल.

दरम्यान, एअरटेलने 8 शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. मात्र या सेवा अद्याप संपूर्ण शहरात उपलब्ध नाहीत. उलट त्या काही स्पॉट्सवरच लाइव्ह करण्यात आले आहेत. जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल तर तुम्हाला 5G सेवेचा अनुभव घेता येईल. यातच जिओने अद्याप 5G रिचार्ज प्लॅन्सची घोषणा सध्या केली नसली तरी, जिओ आपल्या ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा अॅक्सेस करण्याची संधी मिळेल.

 

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget