एक्स्प्लोर
अॅपलचा बजेट आयपॅड लाँच
अॅपलने आपल्या एज्युकेशन इव्हेंटमध्ये 9.7 इंचीचा स्वस्त आयपॅड लाँच केला आहे.

मुंबई : अॅपलने आपल्या एज्युकेशन इव्हेंटमध्ये 9.7 इंचीचा स्वस्त आयपॅड लाँच केला आहे. हा आयपॅड विशेषत: विद्यार्थ्यांसाठी लाँच करण्यात आला आहे. भारतात हा आयपॅड एप्रिल महिन्यात उपलब्ध होणार आहे. किंमत : 9.7 इंचीच्या या आयपॅडची 32 जीबी मॉडेलची किंमत 329 डॉलर (जवळजवळ 21,500 रुपये) आहे. तर विद्यार्थ्यांसाठी हा आयपॅड 299 डॉलर ( 19,000 रुपये) किंमतीत उपलब्ध असणार आहे. याच्या वाय-फाय आणि सेल्युलर मॉडेलची किंमत 459 डॉलर ( 29,763 रुपये) आहे. भारतात 32 जीबी वाय-फाय आणि सेल्युलर मॉडेलची किंमत 38,600 रुपये आहे. फीचर : अॅपलच्या 9.7 इंचीच्या आयपॅडमध्ये A10 फ्यूजन चिप देण्यात आली आहे. हीच चिप अॅपलच्या आयफोन 7 मध्येही देण्यात आली आहे. आयपॅडच्या फ्रंटवर टच आयडी देण्यात आला आहे. तसंच यामध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. A10 फ्यूजन प्रोसेसर चिप असलेल्या या आयपॅडची बॅटरी 10 तासापर्यंत बॅकअप देत असल्याचा दावा अॅपलने केला आहे. विद्यार्थ्यांसाठी आयक्लाउड स्टोरेजमध्ये 200 जीबीपर्यंत स्पेस मोफत देण्यात येणार असल्याचं अॅपलनं जाहीर केलं आहे.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रीडा
निवडणूक
व्यापार-उद्योग





















