एक्स्प्लोर
Advertisement
इंटेक्सचा 32 इंच LED टीव्ही लाँच, किंमत रु. 16,490
मुंबई: दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधत मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी इंटेक्सनं सोमवारी 32 इंच एलईडी टीव्ही लाँच केला. या एलईडी टीव्हीची किंमत अवघी 16,490 रु. आहे. 3222 मॉडेलच्या या एलईडी टीव्हीमध्ये आयसेफ टी-मॅट्रिक्स यांचा समावेश आहे.
कंपनीचे संचालक मरक डेय यांनी सांगितलं की, 'नवा एलईडी आम्ही ग्राहकांच्या भेटीला आणला असून आम्ही त्यामुळे फार उत्साहित आहोत. आमचे टीव्ही ग्राहकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत.'
या एलईडी टीव्हीवर खास दिवाळी ऑफरही आहे. यासोबत 8,000 mAh पॉवर बॅँक मोफत मिळणार आहे. तसंच टीव्हीवर पाच वर्षापर्यंत वॉरंटी मिळणार आहे. ही ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत सुरु आहे.
हा एलईडी टीव्ही इंटेक्ससोबतच इतर ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
करमणूक
मुंबई
Advertisement