Internet Service In India : आज देशात बहुप्रतिक्षित अशा 5G नेटवर्कला (5G Internet Service) सुरुवात झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांच्या हस्ते सर्वात वेगवान अशा 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला. यासह भारताने टेलिकॉम (Telecom Industry) क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. यामुळे भारतीयांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. भारतात सुरु असलेल्या डिजिटल इंडिया (Digital Inadi) चळवळीलाही या 5G इंटरनेट सेवेमुळे (5G Internet Benefits) फायदा होणार आहे. पण, भारतातील नेटवर्क सर्व्हिसेसचा इतिहासही फार मोठा आहे. 1G पासून सुरु झालेलं नेटवर्क आता 5G पर्यंत येऊन पोहोचलं आहे. इंटरनेटच्या या क्रांतीचा प्रवास नेमका कसा आहे हे पाहूयात. 


1G ते 5G इंटरनेटची सेवेची क्रांती :


1G Service : 1980 साली पहिल्या जनरेशनच्या नेटवर्कची सुरुवात झाली. त्यावेळी 24 केबीपीएस स्पीड होता. 


2G Service : 2G इंटरनेटची सुरुवात 1995 मध्ये झाली. तेव्हा इंटरनेटचा स्पीड 100 केबीपीएस वाढविण्यात आसा होता. 


3G Service : 2009 मध्ये सुरूवात झालेल्या या इंटरनेट प्रणालीचा स्पीड तब्बल 5 पटींनी वाढला. हा वेग 500 केबीपीएस होता. 


4G Service : 4G नेटवर्कची भारतात सुरुवात 2012 पासून सुरु झाली. हा इंटरनेटचा स्पीड चक्क एमबीपीएस करण्यात आला. 


5G Service : देशात 5G इंटरनेटची सेवा भारतात आजपासून म्हणजेच (1 ऑक्टोबरपासून) सुरु करण्यात आली. ही सेवा सध्या तरी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदाबाद, जामनगर, गांधीनगर, गुरुग्राम, चंदीगढ, नवी दिल्ली, लखनऊ, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरुचा समावेश आहे. 


आज सुरु करण्यात आलेल्या 5G इंटरनेट सेवेमुळे यूजर्सना अनेक फायदे होणार आहेत. 


5G सुरू करण्याचे फायदे : 



  • 5G सेवा सुरू झाल्यानंतर ऑटोमेशनचे नवे पर्व सुरू होईल. म्हणजे ज्या गोष्टी आजवर मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित होत्या, त्या आता खेड्यापाड्यातही उपलब्ध होणार आहेत. 

  • 5G सेवा सुरू झाल्यानंतर देशात डिजिटल क्रांती होणार आहे. रोबोटिक्स टेक्नॉलॉजी विकसित होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. तसेच, ई-गव्हर्नन्सचा विस्तार होईल.

  • कोरोनानंतर ज्या प्रकारे लोकांचे इंटरनेटवरील अवलंबित्व वाढले आहे ते पाहता, 5G प्रत्येकाचे जीवन अधिक चांगले आणि सोपे बनविण्यात मदत करेल. 

  • 5G तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्यसेवा, आभासी वास्तविकता, क्लाउड गेमिंगसाठी नवीन मार्ग उघडतील.

  • 5G नेटवर्कवरून 10 ते 20 सेकंदात 2 GB चित्रपट डाउनलोड केला जाईल. व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि कारखान्यांमध्ये रोबोट्स वापरणे सोपे होईल. 


महत्वाच्या बातम्या :