मुंबई : रिलायन्सने (Reliance) त्यांची 5G सेवा या दिवाळीपासून होणार असल्याची आज घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला असून ऑक्टोबरमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. 5G संबंधित या सर्व बातम्या समोर येत असताना ज्यांनी नुकताच नवीन मोबाईल घेतला आहे किंवा ज्यांना या महिन्यात नवीन मोबाईल घ्यायचा आहे त्यांच्यासमोर मात्र अनेक प्रश्न उभे आहेत. आपल्या सध्याच्या मोबाईलमध्ये 5G सेवा (5G Internet Service) चालणार की नाही हे आपल्याला पाहता येऊ शकतं. 


आपल्या मोबाईलमध्ये 5G सेवा सुरू आहे का हे असं तपासा, 


1. सर्वात आधी आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा.
2. त्यानंतर आपल्याला Wi-Fi And Network हा पर्याय मिळेल. 
3. त्यानंतर SIM And Network या पर्यायावर क्लिक करा.
4. Network Mode मध्ये गेल्यावर आपल्याला Prefered Network Type मध्ये 5G/4G/3G/2G असं दिसेल. त्यामध्ये जर 5G असं दिसलं तर आपला मोबाईल 5G सेवेला सपोर्ट करतो असा त्याचा अर्थ आहे. त्यामध्ये जर 5G असं दिसलं नाही तर आपला मोबाईल 5G सेवेला सपोर्ट करत नाही. 


रिलायन्सचा 12 हजारात 5G स्मार्टफोन? 


आज झालेल्या रिलायन्सच्या (Reliance) वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) 5G इंटरनेट सेवा (5G Internet Service) सुरू होणार असल्याची घोषणा केली. रिलायन्स जिओची 5G सेवा ही देशातील सर्वात प्रगत सेवा असणार आहे असा विश्वास मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी व्यक्त केला. त्याशिवाय, रिलायन्सकडून देशातील स्वस्तातील 5G स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. या स्वस्त दरातील स्मार्टफोनसाठी रिलायन्सने जगातील दिग्गज आयटी कंपन्यांसोबत भागिदारी केली आहे. मेड इन इंडिया 5G इंटरनेट सेवेसाठी मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्को सारख्या दिग्गज टेक कंपन्यांसोबत भागिदारी केली असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. 


रिलायन्स सगळ्यात स्वस्तातील 5G स्मार्टफोन (5G Smartphone) लाँच करणार असल्याची चर्चा होती. या स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचे म्हटले जात आहे. या स्वस्तातील मोबाईलची वैशिष्ट्ये कसे असतील याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या :