एक्स्प्लोर

इन्स्टाग्रामवरही आता ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग?

आतापर्यंत फक्त टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सोय 'इन्स्टाग्राम'वर होती, मात्र आता तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधता येण्याची शक्यता आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे तिन्ही सोशल मीडिया भारतात लोकप्रिय आहेत. फक्त तरुणच नव्हे, तर सर्वच वयोगटातील व्यक्ती ही अॅप्स वापरतात. आता व्हॉट्सअॅप, फेसबुक पाठोपाठ इन्स्टाग्रामही व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देण्याची चिन्हं आहेत. 'टेकक्रंच'च्या वृत्तानुसार लवकरच इन्स्टाग्रामवर ऑडिओ कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. फोटो अॅप अशी ओळख असलेलं इन्स्टाग्राम लवकरच चॅटिंग अॅप होणार आहे. आतापर्यंत फक्त टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सोय 'इन्स्टा'वर होती. मात्र आता तुम्हाला थेट संवाद साधता येणार आहे. इन्स्टाग्रामवर कॉलिंग फीचर सुरु होण्याची चर्चा जानेवारी महिन्यातही झाली होती. 'डब्ल्यूएबीटाइन्फो' वेबसाईटवर इन्स्टाग्राममध्ये व्हिडिओ कॉलिंगच्या आयकॉनची इमेज दिसली होती. मात्र ती अंतर्गत चाचणी असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत इन्स्टाग्रामकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही. इन्स्टावर जेव्हा व्हिडिओ कॉलिंगची सुविधा येईल, तेव्हा इतर अॅपच्या तुलनेत वाढीव फीचर्स देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. स्नॅपचॅटवर लाईव्ह चॅट करताना फिल्टर्सचा ऑप्शन आहे. तो स्काईप, व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकसारख्या मेसेजिंग अॅप्समध्ये नाही. इन्स्टाग्रामची पेरेंट कंपनी फेसबुकने 2015 मध्येच व्हिडिओ कॉलिंगला सुरुवात केली होती. इन्स्टाग्रामचे सुमारे 80 कोटी सक्रीय यूझर्स आहेत. तर स्टोरीजचं फिचर नियमितपणे वापरणार्‍यांची संख्या 30 कोटींच्या जवळपास आहे. ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगच्या सुरु करताना इन्स्टाग्रामकडे आणखी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सक्रिय यूझर्सच्या संख्येत वाढ होऊ शकते. इन्स्टाग्रामवर सध्या 'लाईव्ह' जाण्याची सुविधा आहे, मात्र व्हिडिओ कॉलिंग सुरु झाल्यास ते व्हॉट्सअॅप-स्काईपला भारी पडणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget