एक्स्प्लोर
आयडियाचा नवा टेरिफ प्लान, 28 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

मुंबई: रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया सेल्युलरनं नवा प्लान आणला आहे. कंपनीनं आपल्या यूजर्ससाठी 348 रुपयांच्या प्लान बदलून आता 300 रुपयांचा नवा प्लान आणला आहे. त्यामुळे आता 300 रुपयात आयडिया यूजर्सला अनलिमिटेड लोकल एसटीडी कॉलिंग आणि दररोज 1 जीबी 4जी डेटा मिळणार आहे. जे पोस्टपेड यूजर्स 199 रु. किंवा त्यापेक्षा वरचा प्लान वापरत असल्यास ते हा नवा टेरिफ प्लान घेऊ शकतील. जे आयडिया यूजर्स 499 रुपये किंवा त्याच्या वरचा प्लान वापरत असल्यास त्यांना ही ऑफर एक महिन्यासाठी फ्री मिळणार आहे. तर 349 आणि 499 रुपयांमधील प्लान वापरणाऱ्या यूजर्सला ही ऑफर डिस्काउंट प्राइज म्हणजेच 50 रु. दर महिन्याला याप्रमाणे तीन महिनपर्यंत ही ऑफर मिळू शकते. जे यूजर्स 199 चे 349 रुपयांचा प्लान वापरतात त्यांना ही ऑफर प्रत्येक महिन्याला 200 रुपये देऊन तीन महिन्यापर्यंत मिळू शकते. कंपनीनं स्पष्ट केलं आहे की, तीन महिन्यानंतर यूजर्सला 1 जीबी डेटा आणि फ्री अनलिमिटेड कॉलिंगसाठी 300 रुपये द्यावे लागणार आहेत. या ऑफरसाठी यूजर्सला 30 एप्रिलपर्यंत हा प्लान सब्सक्राइब करावा लागणार आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















