एक्स्प्लोर
अनलिमिटेड कॉल, 1 जीबी डेटा, आयडियाचा नवीन प्लॅन
109 रुपयात अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल आणि त्याचसोबत 1 जीबी 3G/4G डेटा मिळणार आहे. तसेच, 100 लोकल आणि नॅशनल एसएमएससुद्धा मिळणार आहेत.
मुंबई : आयडिया सेल्युलरने ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. या नव्या प्लॅनची किंमत 109 रुपये आहे. अनलिमिटेड कॉल आणि 1 जीबी 4G/3G डेटा या प्लॅनमध्ये देण्यात येणार असून, 14 दिवसांची प्लॅन व्हिलिडिटी आहे.
मर्यादित सर्कलमध्येच आयडियाने नवीन प्लॅन उतरवल्याने, सगळ्यांनाच याचा फायदा घेता येणार नाही. त्यामुळे अर्थात, ज्या सर्कलमध्ये हा प्लॅन नसेल, तिथल्या आयडिया ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण असणार आहे.
109 रुपयात अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल आणि त्याचसोबत 1 जीबी 3G/4G डेटा मिळणार आहे. तसेच, 100 लोकल आणि नॅशनल एसएमएससुद्धा मिळणार आहेत.
अनलिमिटेड कॉलसाठी मात्र आयडियाने एक अट ठेवली आहे. रोज 250 मिनिटं आणि आठवड्याभरात एक हजार मिनिटं कॉलिंग मोफत असेल.
याआधी कंपनीने 93 रुपयात अशाच पद्धतीच्या ऑफरसह प्लॅन बाजारात आणला होता. मात्र त्या प्लॅनची व्हॅलिडिटी केवळ 10 दिवसांची होती.
दरम्यान, एअरटेलने 93 रुपयांमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रिचार्ज प्लॅन आणले आहेत. एअरटेलने 93 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एक जीबी डेटा मोफत दिला आहे. एअरटेलने या प्लॅनमध्ये एक दिवसाला 250 मिनिटांहून अधिक आणि एका आठवड्याला केवळ एक हजार मिनिटं मोफत कॉलिंगची ऑफर दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement