एक्स्प्लोर
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक
मुंबई: ह्युंदाईनं आपल्या नव्या वेरना सेडान कारचं टीझर नुकतंट लाँच केलं आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातच या कारबाबत कंपनी नेमकी माहिती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ही कार मारुती सुझुकीच्या डिझायर आणि होंडाच्या अमेझला कार बाजारात टक्कर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नव्या वेरना कारचं डिझाइन जवळजवळ ह्युंदाईच्या एलांट्राप्रमाणेच आहे. यामध्ये ह्युंदाईची कास्केडिंग ग्रिल देण्यात आली आहे. एलांट्राप्रमाणेचा या कारमध्ये देखील जे आकाराच्या जे-टाइम रनिंग एलईडी लाईट देण्यात आली आहे. तसेच यात फॉग लॅप्सही देण्यात आले आहेत.
या कारच्या बंपरवर ड्यूल-टोन ट्रिटमेंटसोबत रिफ्लेक्टर्सही देण्यात आले आहेत. नव्या वेरनाची लांबीही वाढण्यात आली आहे. दरम्यान, याच्या इंजिनबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सौजन्य: cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement