एक्स्प्लोर
पेट्रोल-डिझेल मोफत मिळवण्याची संधी, ग्राहकांसाठी ‘ही’ खास ऑफर
या ऑफरचा फायदा उचलण्यासाठी तुमच्याकडे केवळ आजचा (गुरुवार) आणि उद्याचाच (शुक्रवार) दिवस आहे.
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार? हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न... पण आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत विचार करणं सोडून द्या. कारण तुम्हाला आता पेट्रोल मोफत मिळू शकतं. त्यासाठी एक खास ऑफर आहे.
मोबाइल वॉलेट मोबिक्विकनं ही ऑफर आणली आहे. याद्वारे एका ठराविक कालावधीत पेट्रोल-डिझेल भरल्यास तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. पण आता या ऑफरचा फायदा उचलण्यासाठी तुमच्याकडे केवळ आजचा (गुरुवार) आणि उद्याचाच (शुक्रवार) दिवस आहे.
20 नोव्हेंबरला या ऑफरची सुरूवात झाली असून उद्या म्हणजे 24 नोव्हेंबरला शेवटचा दिवस असणार आहे.
मोफत पेट्रोल मिळवण्यासाठी नेमकं काय कराल?
- तुम्हाला संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत पेट्रोल भरावं लागले
- मोबिक्विक मोबाईल वॉलेटनं पेमेंट करावं लागेल
- यासाठी किमान 10 रूपयांचं पेट्रोल भरावं लागले
- 100 टक्के कॅशबॅकची ऑफर असली तरी यासाठी 100 रूपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
- पेट्रोल पंपावर पेमेंट करताना केवळ क्यूआर (QR) कोड स्कॅन करावा लागेल
- जेवढ्या रूपयांचं पेट्रोल भरलं असेल तो आकडा टाकावा.
- त्यानंतर तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक 24 तासांच्या आत मिळेल
नोट : ही ऑफर मिळवण्याआधी संबंधित मोबाइल वॉलेटच्या अटीही जाणून घ्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement