एक्स्प्लोर
Advertisement
भीम अॅपद्वारे 25 रुपये कसे मिळवाल?
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीम अॅप रेफरल योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत तुमच्या रेफरन्सने व्यापारी किंवा ग्राहकाने भीम अॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला दहा रुपये मिळणार आहेत.
तुम्ही ज्या यूझरला रेफरन्स दिला आहे, त्याने भीम अॅप डाऊनलोड केल्यानंतर रेफरल कोड म्हणून तुमचा मोबाईल क्रमांक वापरणं गरजेचं आहे. मात्र हा कोड वापरण्यापूर्वी नवीन ग्राहकाने भीम अॅपवर नोंदणी करणं आणि तीन व्यवहार करणं गरजेचं आहे. या प्रोसेसनंतर 10 रुपये तुम्हाला मिळतील.
भीम अॅपचा नवीन यूझर या ऑफरनुसार 25 रुपये मिळवू शकतो. पहिला व्यवहार करताना तुमचा भीमवर नोंद केलेला मोबाईल क्रमांकच रेफरल कोड म्हणून वापरावा लागेल. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे गेल्यास व्यवहार यशस्वी होईल. 1 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार करता येऊ शकतो. मात्र स्किमचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 50 रुपयांचा व्यवहार करावा लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
क्राईम
मुंबई
Advertisement