एक्स्प्लोर
'या' स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात
फेसअनलॉक फीचरसाठी ओळखल्या जाणारा ‘ऑनर 7x’ घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ‘ऑनर 7x’च्या किमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
मुंबई : फेसअनलॉक फीचरसाठी ओळखल्या जाणारा ‘ऑनर 7x’ घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ‘ऑनर 7x’च्या किमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
या स्मार्टफोनचे 32 GB मॉडल आता 11,999 रुपये तर 64 GB मॉडल 14,999 रुपयांत उपलब्ध असेल. याबरोबरच ऑनरकडून या स्मार्टफोनसाठी एक अपडेट आलं आहे, ज्यामुळे ‘ऑनर 7x’ मध्ये आता अनेक नवे फीचर्स उपलब्ध होणार आहेत. या अपडेटमध्ये गेम सूट्स, राईड मोड, AR लेंस यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.
हा स्मार्टफोन 2017 साली भारतात लाँच करण्यात आला होता.
कसा आहे ‘ऑनर 7x’ स्मार्टफोन?
यामध्ये 18:9 अस्पेक्ट रेशोचा एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑल मेटल डिझाईन आणि फेस अनलॉक फीचरही देण्यात आल्यामुळे या फोनची चांगलीच चर्चा झाली होती. हे फेसअनलॉक फीचर याच वर्षी कंपनीकडून देण्यात आलं आहे. तसंच ‘ऑनर 7x’मध्ये बेजेल लेस 5.9 इंच फुल HD प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. ड्युअल कॅमेरा फीचर असलेल्या या फोनमध्ये प्रायमरी सेन्सर 16 मेगापिक्सल तर डेप्थ सेन्सर 2 मेगापिक्सलचा आहे.
त्याचबरोबर ‘ऑनर 7x’मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement