एक्स्प्लोर
होंडाचं 'बेस्ट डील' सेकंड हॅण्ड बाइक शोरुम सुरु!

गाझियाबाद (उत्तरप्रदेश): होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया लिमिटेडनं शनिवारी गाझियाबादमध्ये पहिल्या सेकंड हॅण्ड बाइक शोरुम 'बेस्ट डील'चं उद्घाटन केलं. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना विश्वसनीय पण सेकंड हॅण्ड बाइक खरेदी करायच्या आहेत त्यांच्यासाठी कंपनीनं हे बेस्ट डील शोरुम सुरु केलं आहे. 'बेस्ट डील'मध्ये ग्राहकांना स्वस्तात होंडाच्या दुचाकी खरेदी करता येणार आहेत. याबरोबर जुन्या दुचाकी बदलून नवीन किंवा होंडाची सेकंड हॅण्ड बाइक खरेदी करता येऊ शकते. बेस्ट डीलमध्ये ग्राहकांच्या सुविधा लक्षात घेऊन सेकेंड हॅण्ड गाडी विकणाऱ्या मालकाच्या गाडीचे कागदपत्र आणि नव्या ग्राहकाच्या वाहनाची ओनरशीप याचं लवकरात लवकर ट्रान्सफर देण्याचीही हमी देतं. सेकंड हॅण्ड वाहनांनमुळे वाहन बाजाराला एक व्यवस्थित रचना मिळू शकते असं होंडाला वाटतं. होंडा मोटरसायकलचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंह गुलेरिया म्हणाले की, 'आम्हाला असं दिसून आलं की, मागील 10 वर्षापासून फार दुचाकी बदलल्या गेल्या नाही. त्यामुळे ग्राहकांचा बदलत्या सवयीनुसार, आम्हाला भविष्यात सेकंड हॅण्ड दुचाकीमध्ये मोठी गुंतवणूक दिसून येते आहे. त्यामुळेच 'बेस्ट डील' हे आम्ही ग्राहकांसाठी घेऊन आलो आहे. तसेच याचा लवकरच देशभरातही विस्तार करु.'
Before You Go
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी






















