एक्स्प्लोर

GSTनतंर मोबाईल बिल आणि रिचार्ज व्हाऊचरमध्ये मोठे बदल!

मुंबई: देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंतच्या कर व्यवस्थेतील हा सर्वात मोठा बदल असणार आहे. देशभरात वस्तू आणि सेवांवर यापुढे फक्त एकच टॅक्स असणार आहे. जीएसटीमध्ये सरकारनं वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी वेगवेगळे टॅक्स स्लॅब ठेवले आहेत. जर टेलिकॉम इंडस्ट्रीचा विचार केला तर जीएसटीमुळे टेलिकॉम सेक्टर महाग होणार आहे. कारण की, टेलिकॉम सेक्टरसाठी केंद्र सरकारनं 18 टक्के टॅक्स स्लॅब निश्चित केला आहे. सध्या टेलिकॉमवर 15 टक्के टॅक्स लागतो. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात सध्या नाराजी आहे. टेलिकॉम क्षेत्र पहिल्यापासूनच अडचणीत असताना अशावेळी सरकारनं यावर 18 टक्के स्लॅब ठेवल्यानं या क्षेत्रातील अडचणीत भर पडली आहे. पण कंपन्या आपल्यावरील या टॅक्सचा हा भार यूजर्सवरच टाकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात एंट्री केल्यापासून सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी अनलिमिटेड कॉलिंग सुरु केलं आहे. तसेच डेटाच्या किंमतीतही कपात केली आहे. अशावेळी टॅक्सचे दर वाढल्यानं या क्षेत्रासाठी अडचणीचं ठरु शकतं. पोस्टपेड यूजर्सचा विचार केल्यास त्यांना जीएसटी महाग पडणार आहे. जर एखाद्या यूजरचं बिल आतापर्यंत 1000 रुपये येत असेल तर जीएसटी लागू झाल्यानंतर यामध्ये 30 रुपये आणखी वाढणार आहेत. त्यामुळे तुम्हाला 1030 रुपये बिल भरावं लागणार आहे. तर कंपन्या प्रीप्रेड यूजर्सला कमी टॉकटाईम देऊ शकतात. एका वृत्तानुसार, 1 जुलैपासून सर्व टॉकटाइम ऑफर देणाऱ्या वाउचरवर कंपन्या 18 टक्के जीएसटी लागू करणार आहे. त्यामुळे फुल टॉकटाइम मिळणाऱ्या प्लानवर कमी टॉकटाइम मिळू शकतं. अनलिमिटेड कॉलिंगशिवाय व्होडाफोन, एअरटेल, आयडिया यासारख्या कंपन्या फ्री अॅडिशनल डेटाही देत आहेत. सध्या एअरटेल आणि व्होडाफान आपल्या ग्राहकांसाठी फ्री डेटा देत आहेत. त्यामुळे 1 जुलैपासून टेलिकॉम इंडस्ट्री नेमकं काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Embed widget