एक्स्प्लोर

कुठंही जाताना GPS चा वापर करत असल्यास सावधान...

लंडन : सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात अनेकजण अॅन्ड्रॉईड मोबाईलमुळं कुठंही जाण्यासाठी मोबाईलमधल्या GPS चा सर्रास वापर करतात. पण जीपीएसचा वारंवार वापर तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं, वैज्ञानिक संशोधनातून समोर आलं आहे. जीपीएसच्या वापरामुळं तुमच्या मेंदूमधील इतर मार्ग शोधण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो, असा निष्कर्ष वैज्ञानिकांनी नोंदवला आहे. लंडनमधील विद्यापीठ कॉलेजच्या संशोधकांनी हा निष्कर्ष नोंदवला असून, यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या 24 स्वयंसेवकांवर याचे संशोधन केलं आहे. या 24 संशोधकांना सेंट्रल लंडनमधील रस्ते शोधायचं काम दिलं होतं. यावेळी त्यांच्या मेंदूच्या क्रियावर बारकाईनं लक्ष देण्यात येत होतं. यामध्ये त्या स्वयंसेवकांच्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पस नावाच्या कार्यप्रणालीचं निरिक्षण करण्यात आलं. जो मेंदूमधील स्मारणशक्तीचं आणि नेव्हिगेशनचं काम करतो. याशिवाय मेंदूमधील नियोजन आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया करणाऱ्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचंही निरिक्षण करण्यात आलं. या संशोधनावेळी या सर्व स्वयंसेवकांना लंडनमधील नागमोडी वळणाच्या किचकट रस्ते शोधायला सांगितलं होतं. ज्यातून त्यांचा मेंदू कशाप्रकारे काम करतो, हे समजून शकेल. या संशोधनाच्या निमित्तानं हे स्वयंसेवक लंडनच्या रस्त्यावर उतरले, त्यावेळी त्यांना सुरुवातीला जीपीएसचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पस आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स योग्य प्रकारे कार्यन्वित असल्याचं संशोधकांना आढळून आलं. पण जेव्हा जीपीएस वापर करण्याची त्यांना सूट देण्यात आली, त्यावेळी त्या स्वयंसेवकांच्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पस आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स कार्यन्वित नसल्याचं आढळून आलं. या संशोधनासंदर्भात लंडनच्या विद्यापीठ कॉलेजचे ह्यूगो स्पायर्स यांनी सांगितलं की, जेव्हा  एखाद्या व्यक्तीला शहरातील रस्त्यांच्या जंजाळातून आपल्या इच्छित स्थळ शोधायचं असतं, तेव्हा त्यांच्यासमोर अनेक अडचणी असतात. त्यावेळी जर त्याच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध नसेल, तर तो त्याच्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पस आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर अधिकचा जोर देतो. पण जेव्हा त्याच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध असते, त्यावेळी तो कोणत्याही अडचणींशिवाय त्या इच्छित स्थळी सहज पोहोचतो. पण यावेळी त्याच्या मेंदूमधील इच्छित स्थळांकडे जाणारे इतर मार्ग वापरण्यास टाळतो. यापूर्वीही या विषयावर संशोधन झालं होतं.त्यामध्ये लंडनमधील टॅक्सी ड्रायव्हरच्या हिप्पोकॅम्पीमध्ये मोठी वाढ झाली होती. कारण त्यांनी सेंट्रल लंडनमधील तिथले लॅण्डमार्ग आणि प्रत्येक रस्ता चांगलाच लक्षात ठेवला होता. पण या नव्या संशोधनातून जे ड्रायव्हर सॅटेलाईट नेव्हिगेशनच्या निर्देशांचा वापर करत आहेत, ते आपल्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पसचा वापर करत नाहीत. त्यामुळे शहरातील इतर रस्त्यांविषयीची त्यांची माहिती मर्यादित होते. नेचर कम्यूनिकेशन जर्नलमध्ये या संशोधनाचं वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
AI Impact on Software Engineers:
"AI तूने क्या किया?" एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
Mamata Banerjee: इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
Embed widget