एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डेंग्यू, चिकनगुनियासारख्या रोगांपासून लोकांना वाचवण्यासाठी गुगलचा पुढाकार
डेंग्यू, चिकनगुनियासारख्या रोगांपासून लोकांना वाचवण्यासाठी गूगलने पुढाकार घेतला आहे. गुगलची मातृ कंपनी असलेल्या अल्फाबेटने अमेरिकेतल्या वैज्ञानिकांच्या मदतीने आजार पसरवणाऱ्या डासांचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी एक मोहीम सुरु केली आहे.
सॅन फ्रान्सिस्को : डेंग्यू, चिकनगुनियासारख्या रोगांपासून लोकांना वाचवण्यासाठी गूगलने पुढाकार घेतला आहे. गुगलची मातृ कंपनी असलेल्या अल्फाबेटने अमेरिकेतल्या वैज्ञानिकांच्या मदतीने आजार पसरवणाऱ्या डासांचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी एक मोहीम सुरु केली आहे.
'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, कॅलिफोर्नियाच्या फ्रेस्नो काऊंटीमध्ये लाखोंच्या संख्येने स्टेंड मेल मॉस्कीटो (डास) हवेत सोडले जातील. हे पुरुष जातीचे डास मादी डासाच्या संपर्कात येतील, त्यानंतर मादी डास जेव्हा अंडी देतील. त्यातून डासांचं प्रजनन होणार नाही.
अल्फाबेटच्या या मोहीमेला 'डिबन फ्रेस्नो' असं नाव देण्यात आलं आहे. याचं नियोजन अल्फाबेटची सहयोगी कंपनी वेरली करत आहे.
वैज्ञानिकांच्या मते, याचा मुख्य उद्देश 'एडिज एजिप्ट' प्रजातीच्या डासांची संख्या कमी करण्याचा आहे. डासांची ही प्रजात झिका, डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रदुर्भाव करण्यासाठी कारणीभूत असतात.
फ्रेस्नो काऊंटीच्या दोन भागात ही अल्फबेटकडून ही मोहीम राबण्यात येणार आहे. यात एकूण 20 आठवड्यांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त स्टेंड मेल डास हावेत सोडले जातील. हे डास वोलबचिया बॅक्टरियापासून संक्रमित असतील. वोलबचिया हा जिवाणू निसर्गातील 40 टक्के किटकांमध्ये आढळतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement