एक्स्प्लोर
गुगल अँड्रॉईडमध्ये 'बग' शोधणाऱ्याला 2 लाख डॉलरचं बक्षीस!

मुंबई: 'जूडी' मालवेअरमुळे 3.65 कोटी अँड्रॉईड फोनवर परिणाम झाला आहे. त्यानंतर आता गुगलनं अँड्रॉईड ओएसमधून 'बग' शोधणाऱ्यांना बक्षीस म्हणून दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ केली आहे. त्यामुळे आता बक्षीसाची रक्कम तब्बल 2 लाख डॉलर करण्यात आली आहे. सायबर सुरक्षा फर्म चेक पॉईंटनुसार, प्ले स्टोअरमध्ये जवळजवळ डझनभर मालवेअर असलेले अॅप आढळून आले आहेत. आतापर्यंत 45 लाख ते 1.85 कोटी जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहेत. मालवेअर असलेले अॅप मागील अनेक वर्षापासून प्ले स्टोअरवर असल्याचं समजतं आहे. एक्सट्रीमटेक डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, जुन्या अँड्रॉईड ओएस असणाऱ्या मोबाइलमध्ये मालवेअरनं शिरकाव केला आहे. अँड्रॉईडचं नवं व्हर्जन सुरक्षित आहे. जे ऑपरेटिंग सिस्टम गुगलनं काही वर्षापूर्वी विकसित केले होते त्यांना सध्या धोका आहे. त्यामुळे आतापर्यंत गुगलच्या नव्या अँड्रॉईडमध्ये कोणताही बग शोधता आलेला नाही. त्यामुळेच कंपनीनं आपल्या ओएसला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आणि जास्तीत रिसर्चर किंवा इंजिनिअर यांनी सहभागी होण्यासाठी बक्षीसाच्या रक्कमेत वाढ केली आहे. गुगलनं दोन वर्षापूर्वी बक्षीस देण्याचं जाहीर केलं आहे. पण आतापर्यंत कुणीही हे बक्षीस जिंकू शकलेलं नाही. संबंधित बातम्या: WhatsAppवरील 'या' मेसेज लिंकवर चुकूनही क्लिक करु नका! अँड्रॉईड डिव्हाईसला Judy मालवेअरचा धोका, 3.6 कोटी यूजर्सला फटका
Before You Go
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले






















