एक्स्प्लोर

हॅप्पी बर्थडे गुगल! 20 व्या वाढदिनी खास डूडल

नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून, यूजर्सला नवनव्या गोष्टींची ओळख करुन देणाऱ्या गुगलने, डूडलद्वारे आपला 20 वर्षांचा प्रवास दाखवला आहे.

मुंबई: प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा सर्वांचा मित्र गुगल आज 20 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रत्येकाला डूडलद्वारे हटके शुभेच्छा देणाऱ्या गुगलने स्वत:च्या बर्थडेलाही तसंच जबरदस्त व्हिडीओ डूडल केलं आहे. नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून, यूजर्सला नवनव्या गोष्टींची ओळख करुन देणाऱ्या गुगलने, डूडलद्वारे आपला  20 वर्षांचा प्रवास दाखवला आहे. गुगलवर सर्च करताना या 4 गोष्टींची खबरदारी घ्या! गुगलने 20 वर्षांच्या काळात सातत्याने नवनवे बदल केले. आज बर्थ डेनिमित्त गुगलने स्वत:चं डूडल साकारत, गेल्या 20 वर्षातील संस्मरणीय डूडलचा संग्रह सादर केला. हे डूडल गुगलच्या जुन्या आठवणीत घेऊन जातं. स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतील दोन विद्यार्थ्यांनी 27 सप्टेंबर 1998 रोजी नवं सर्च इंजिन लॉन्च केलं होतं. जगभरातील माहितीचा खजिना सर्वांसाठी खुला व्हावा असा त्यांचा हेतू होता. हा खजिना गुगल म्हणून नावारुपाला आला. गुगल हे जगातील टॉप सर्च इंजिन आहे. जवळपास 150 भाषांमध्ये गुगल उपलब्ध आहे. जगातील 190 हून अधिक देशांमध्ये त्याचा विस्तार आहे. गूगलचा इतिहास काय? - 4 सप्टेंबर 1998 रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना झाली. गूगलची स्पेलिंग मिस्टेक - तुम्हाला माहित आहे का, गूगलच्या स्पेलिंग मिस्टेकमागील किस्सा? खरंतर आताच्या 'Google'चं नाव ठेवायचं होतं 'Googol'. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे 'Google' असं झालं आणि तेच नाव पुढे प्रसिद्ध झालं . आज तर इंटरनेट सर्च इंजिनचं जायंट म्हणून गूगलकडे पाहिलं जातं. बरं त्याआधीही पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव 'बॅकरब' असं ठेवलेलं. मात्र, त्यानंतर गूगल असं नाव करण्यात आले. डोमेन रिजस्ट्रेशन आणि डूडलची सुरुवात -  1997 साली कंपनीने डोमेन रजिस्टर केलं आणि अधिकृतपणे 'गूगल' असे नाव ठेवण्यात आले. 2002 साली गूगलने पहिल्यांदा डूडल तयार केलं. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गूगल आपल्या होमपेजवर डूडल प्रसिद्ध करतं. गूगल..... द जायंट! - गूगल जगभरात प्रसिद्ध असलेलं सर्च इंजिन आहे. प्रत्येक विषयांवरील माहिती, संदर्भ इथे अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. सुरुवातील असं होतं की, फक्त दुसऱ्या वेबसाईट्सचे डिटेल्स पुरवल्या जातील. मात्र, या कंपनीने या विचारात बदल करुन असं प्लॅटफॉर्म बनवण्याचं ठरवलं की, जगभरातील माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. एका क्लिकवर सर्व काही.
संबंधित बातम्या  कसे रंग भरले जातात गुगल डूडलमध्ये?  आता इंटरनेट कनेक्शन शिवायही गुगल मॅप वापरा  गुगलच्या चुकीमुळेच तुमच्या मोबाईलध्ये ‘UIDAI’चा नंबर   गुगलवर सर्च करताना या 4 गोष्टींची खबरदारी घ्या!

महत्त्वाच्या बातम्या

एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget