Tips for Using Free WI-FI : स्मार्टफोनमधील इंटरनेटचा वापर लोक करतात.  फोनमध्ये इंटरनेट नसेल तर तुम्ही कोणत्याही अॅप्सचा वापर करू शकत नाही. अनेक वेळा इंटरनेट डेटा संपल्याने लोक फ्री वाय-फायचा वापर करतात.  मॉल्स

  आणि पार्क या सार्वजनिक ठिकाणी फ्री वाय-फायची सुविधा असते.  फ्री वाय-फायने तुम्ही हवा तितका डेटा वापरू शकता. पण फ्री वाय-फायमुळे  तुमच्या  फोनमधील पर्सनल डेटा सुरक्षित राहू शकत नाही. जाणून घ्या  फ्री वाय-फायमुळे होणारे नुकसान- 
 
फोन हॅक होऊ शकतो- 
सर्वजनिक ठिकाणी मिळणाऱ्या फ्री वाय-फायचा वापर केल्याने तुमचा लॅपटॉप किंवा फोन हॅक होऊ शकतो. हॅकर तुमचे डिव्हाइज हॅक करून कंट्रोल करू शकतो. हॅकर्स तुमची पर्सनल माहिती, तसेच बँकेसंबंधित माहिती हा सर्व डेटा चोरी करू शकतात. हॅकर्स वाय-फायचा पासवर्ड  फ्री ठेवतात. त्यामुळे कोणीतीही व्यक्ती या वाय-फायला आपले डिव्हाइज कनेक्ट करू शकते. जेव्हा तुम्ही वाय-फाय कनेक्ट करता तेव्हा तुमचा आयपी एड्रेस आणि मॅक अॅड्रेस हॅकर्सकडे जातो. त्यानंतर डेटा पॅकेट्स स्वरूपात ट्रान्सफर होतो. हॅकर्स या पॅकेट्सला इंटरसेप्ट करून तुमची ब्राउजिंग हिस्ट्री चेक करतात.


New Electric car launching in India भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत 'या' कंपनीची एन्ट्री; जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही!


फ्री वाय-फाय वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा- 
पासवर्ड नसणाऱ्या वाय-फायचा वापर करू नका. 
फ्री वाय-फाय वापरत असताना कोणतेही ऑनलाइन पेमेंट करू नका. कारण ऑनलाइन पेमेंट करताना तुम्ही जे पासवर्ड आणि बँक डिटेल्स फोनमध्ये टाकाल ते हॅकर्स हॅक करू शकतात. 
वाय-फायचा वापर करताना इतर शेअरींग अॅप्सचा वापर करू नका.
कोणतेही पासवर्ड वाय-फाय सुरू असताना सेव्ह करू नका.   


संबंधित बातम्या :


Facebook Stock Falls : सर्व्हर डाऊनचा फेसबुकला फटका, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान


हिंसेसंबंधी पोस्ट, अपशब्द आणि अनधिकृत अकाऊंट्सला रोखण्यात फेसबुक अपयशी! रिपोर्टमधून माहिती


WhatsApp New Features: आता व्हॉट्सअॅप वेबमध्ये मिळणार मोबाईल अ‍ॅपचे फिचर्स; काम होणार सोपे