Toyota Fortuner vs MG Gloster review : फोर्डने भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता एसयुव्ही कार श्रेणीमध्ये फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टर यांच्यात स्पर्धा राहिली असल्याचे चित्र आहे. तुमच्यासाठी चांगली एसयूव्ही कोणती असू शकते यासाठी आम्ही जवळपास एक आठवडा कारची चाचणी केली. यामध्ये ऑफ रोडिंग ड्राइव्ह केले. या काही मोठ्या एसयूव्ही कार असून लांबच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय या एसयूव्ही शहरातील प्रवासासाठीदेखील उत्तम आहेत. आपण दररोज लडाखसारख्या उंच, डोंगराळ ठिकाणी कार चालवण्यासाठी जात नाही. शहरात या कारचा वापर महत्त्वाचा ठरतो. 








फॉर्च्युनर आणि ग्लोस्टर या दोन्ही कार आकर्षक आणि आकाराने मोठ्या आहेत. ग्लोस्टर ही कार फॉर्च्युनरपेक्षा मोठी दिसते. फॉर्च्युनर ही कार लहान दिसत असली तरी फेसलिफ्ट केलेल्या फॉर्च्युनरला एक नवीन रुप दिसते. त्यामुळे ही कार तरूण भासते. ग्लोस्टर कारच्या खिडक्या मोठ्या आहेत. फॉर्च्युनरपेक्षा ग्लोस्टर अधिक प्रीमियम कार दिसते. कोणती कार खरेदी करायची हा निर्णय तुमचा असेल. मात्र, तुमच्या कारने इतरांवर छाप सोडली पाहिजे असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे. त्यानुसार अनेकजण कार खरेदी करतात. 


नवीन फॉर्च्युनर कारमध्ये अधिक प्रीमियम केबिन आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले आहेत, अशी तुमची भावना होऊ शकते. कारची अंतर्गत रचना अधिक लक्झरी कार असल्याचे दिसते. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, 10-स्पीकर JBL ऑडिओ आणि वायुविजनासाठी योग्य जागा अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. ग्लोस्टर कारची केबिनला अधिक प्रीमियम टॅन लूक आहे. या कारमध्ये फ्युचरिस्टिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असून मोठ्या आकाराची स्क्रिन आहे. एअर प्युरिफायर, पॅनोरॅमिक सनरुफ, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल. फ्रंट सीट हिटींग, हँड्स फ्री टेलगेट आणि ऑटो पार्किंगची सुविधा या कारमध्ये उपलब्ध आहे. कन्फर्ट आणि जागेच्याबाबतीत ग्लोस्टर ही उत्तम कार आहे. फॉर्च्युनर ही आकाराने काहीशी लहान वाटत असली तरी कारच्या दुसऱ्या रांगेत चांगली मोकळी जागा आहे. तर, तिसऱ्या रांगेत सामान, लहान मुलांसाठी मोठी जागा आहे. 


या एसयुव्ही कार शहरात वापरण्याजोग्या आहेत. त्यामुळे त्याच्या काही वैशिष्ट्यांकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. ग्लोस्टर लहान आकाराच्या डिझेल इंजिनासह येते. मात्र, त्यात ट्विट टर्बो पॉवर आहे म्हणजे 218bhp आणि 480Nm चे पॉवर आउटपुट पुरसे आहे. शहरात ही कार चालवण्यासाठी चांगली आहे. स्टेअरिंग हलके असून पार्किंगसाठीही सुलभ आहे. फॉर्च्युनर कारचे स्टेअरिंग काहीसे जड आहे. पार्किंग करताना काहीसे अडचणीचे ठरते. इंजिनाचा आवाजही इतर कारच्या तुलनेत अधिक आहे. कारमधील 2.8 लीटर डिझेल इंजिनमुळे कारला अधिक शक्ती मिळते. त्यामुळे इंजिनची कार्यक्षमता थोडी सुधारली आहे. 500Nm टॉर्क आणि 204bhp म्हणजे थ्रॉटलवर हलका टॅप फॉर्च्युनरला अधिक सहज बनवते. लांब पल्ल्यासाठी ड्रायव्हिंग करताना ग्लोस्टर कार चालवणे सुलभ आहे. 


ग्लोस्टर ही शहरात अधिक चांगल्या प्रकारे धावण्यास सक्षम आहे. सस्पेन्शन प्लिअंट असून लक्झरी एसयूव्ही असल्याची जाणीव होते. फॉर्च्युनर काहीशी जड वाटू शकते. कमी वेगात कारला अधिक धक्के बसत असल्याचे जाणवू शकते. मात्र, कार वेगात असताना फॉर्च्युनर ही कार जबरदस्त आहे. ऑफरोडवर ड्राइव्ह करतानाही कारचा अनुभव चांगला आहे. फॉर्च्युनर ही सर्वोत्तम ऑफ-रोड एसयूव्ही आहे.


ग्लोस्टर ही कार ऑफरोड ड्राइव्हपेक्षा लक्झरी एसयूव्ही अधिक आहे. बेसिक ऑफरोड ड्राइव्हसाठी ग्लोस्टर योग्य ठरू शकते. ग्लोस्टर कार ही फिचर्स, डिझाइनच्याबाबतीत लक्झरी एसयूव्ही असल्याचे दिसते. या कारची किंमत 30 लाखांपासून सुरू होते आणि 37.68 लाखांपर्यंत आहे. तर, फॉर्च्युनर कारची किंमत 30 लाखांपासून सुरू होते.