एक्स्प्लोर
फ्लिपकार्टवर 15 मे पासून ऑनलाइन सेल, 'बिग शॉपिंग डेज' दरम्यान स्मार्टफोन्सवर मिळणार भरघोस सुट
15 ते 19 मे दरम्यान 4 दिवस चालणाऱ्या या ऑनलाइन सेलमध्ये अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर आकर्षक सुट देण्यात येणार आहे.

फाईल फोटो
'फ्लिपकार्ट' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने Big Shopping Days या ऑनलाइन सेल ची घोषणा केली आहे. 15 मे पासून हा सेल सुरु होणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या ऑनलाइन सेलमध्ये अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर आकर्षक सुट देण्यात येणार आहे.
15 ते 19 मे दरम्यान चालणाऱ्या या ऑनलाइन सेलमध्ये अॅपल, सॅमसंग, शाओमी, विवो, ओपो या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सच्या किंमतींवर सुट देण्यात येणार आहे. तसेच एचडीएफसी बॅंकेचं क्रेडीट किंवा डेबिट कार्ड वापरुन पेमेंट केल्यास आणखी 10 टक्के सुट मिळणार आहे.
फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर या सेलदरम्यान कोणत्या मोबाईल फोनवर किती सुट देण्यात येणार आहे त्याची माहिती देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोबाईल फोन सोबतच इलेक्ट्रॉनिक उपकरणं, कपडे, फर्निचर यांच्या किंमतीवर देखील आकर्षक सुट फ्लिपकार्ट कडून देण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन या वेबसाईटवर देखील अशाचप्रकारे ऑनलाइन सेल दरम्यान मोबाईल फोन आणि इतर प्रॉडक्टसवर सुट देण्यात आली होती. या महिन्यात अनेक कंपन्यांचे नवे स्मार्टफोन बाजारात येत आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांच्या सध्या बाजारत असलेल्या फोन्सवर सेलदरम्यान भरघोस सुट देण्यात येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
