एक्स्प्लोर
फ्लिपकार्ट 'बिग 10 सेल' : आयफोन 7 प्लसवर तब्बल 17 हजारांची सूट
मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टचा 14 मे ते 18 मे 'बिग 10 सेल' सुरु आहे. फ्लिपकार्टवरील या सेलमध्ये स्मार्टफोनवर स्पेशल डिस्काउंट देण्यात आलं आहे. तर HDFC बँकेच्या कार्डावर 10% डिस्काउंट देखील आहे.
या सेलमध्ये सर्वाधिक सूट आयफोन 7 प्लसवर देण्यातआली आहे. तब्बल 17 हजार रुपये सूट या स्मार्टफोनवर देण्यात आली असून हा स्मार्टफोन 54,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तसंच यावर 20,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे.
या सेलमध्ये गुगल पिक्सल या स्मार्टफोनवर तब्बल 13 हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 43,999 रुपयात खरेदी करता येईल. तसेच यावर 29,000 पर्यंत एक्सचेंज ऑफरही आहे.
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ओप्पो आणि विवो या स्मार्टफोनवरही 4 हजारांपर्यंत सूट आहे. तर मोटो G3 टर्बो स्मार्टफोन 6,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement