एक्स्प्लोर
Advertisement
भीम अॅपवरुन रेल्वे तिकीट बुक करा, मोफत प्रवासाची संधी मिळवा
भीम अॅपद्वारे रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या पाच लकी प्रवाशांना त्याच महिन्यात मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने कॅशलेस तिकीटाला प्रोत्साहन देण्यासाठी नवी योजना सुरु केली आहे. भीम अॅपच्या माध्यमातून बुकींग केल्यास रेल्वेतर्फे प्रवाशांना एक खास ऑफर देण्यात येणार आहे.1 डिसेंबर ते 31 मार्चपर्यंत ही योजना लागू करण्यात आली आहे.
IRCTC ने गेल्याच महिन्यात आपल्या वेबसाईटवर भीम अॅपवरुन रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे भीम अॅपद्वारे रेल्वे तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना नवी ऑफर देऊ केली आहे.
रेल्वेच्या नव्या ऑफरनुसार, प्रत्येक महिन्याला पाच प्रवाशांची निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून करण्यात येईल. या पाचही प्रवाशांना त्यांच्या तिकीटाचे पैसे परत मिळतील. यातील पहिल्या पाच विजेत्यांची घोषणा याच महिन्यात केली जाईल.
1 डिसेंबरपासून ही योजना लागू करण्यात आली असून, 31 मार्च 2018 पर्यंत याचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. पण प्रवाशांनी IRCTC वर तिकीट बुक करताना भीम अॅप किंवा UPI पेमेंटचा वापर केला असल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement