एक्स्प्लोर
Advertisement
फेसबुकसारखं भन्नाट फीचर आता WhatsApp मध्ये!
यूजर्सची आवड लक्षात घेता व्हॉट्सअॅपने देखील आता फेसबुकसारखं एक भन्नाट फीचर आणलं आहे.
मुंबई : आपलं स्टेटस फीचर आणखी यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी व्हॉट्सअॅपनं फेसबुकसारखं एक भन्नाट फीचर आणलं आहे. व्हॉट्सअॅपनं नुकतंच एक नवं अपडेट जारी केलं आहे. ज्यामुळे याच्या 25 कोटी अॅक्टिव्ह यूजर्सला टेक्स्ट आधारित 'स्टेटस' अपडेट शेअर करता येईल.
या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅप यूजर्स फेसबुकप्रमाणे कलरफूल बॅकग्राऊंडवर टेक्स्ट लिहून आपलं स्टेटस शेअर करता येणार आहे.
याबाबत व्हॉट्सअॅपनं माहिती देताना सांगितलं की, 'या फीचरमुळे यूजरला आपले विचार मजेदार आणि वैयक्तिक स्वरुपात अपडेट करता येतील. टेक्स्ट स्टेट्स कस्टमाइज करण्यासाठी यूजर्स एखादा खास फॉण्ट आणि बॅकग्राऊंड कलर निवडावा लागेल. तसेच यासोबत लिंकही जोडता येईल.'
हे नवं फीचर आयफोन आणि अँड्रॉईड फोनसाठी उपलब्ध आहे. याशिवाय यूजर्स स्टेट्स अपडेट आपल्या व्हॉटसअॅप वेब व्हर्जनवरही पाहू शकतात.
हे फीचर तुम्ही व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हेसी सेटिंगमध्ये जाऊन अॅक्टिव्हेट करु शकतात.
तसेच यूजर्स आपल्या मित्रांच्या स्टेटस अपडेटवरही रिप्लाय करु शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement