एक्स्प्लोर

फेसबुक धोकादायक मजकूर ठळकपणे आधोरेखित करणार!

फेसबुक या सोशल मीडिया कंपनीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे फेसबुक धोकादायक मजकूर ठळकपणे आधोरेखित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रचंड आकर्षक आणि वृत्तमूल्य असलेला पण सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक असलेल्या राजकीय-सामाजिक मजकुराला यापुढे धोकादायक म्हणून आधोरेखित केलं जाईल, असं फेसबुकनं स्पष्ट केलं आहे. जवळपास 90 हून अधिक कंपन्यांनी फेसबुकवर जाहिराती देण्यास नकार दिल्यानंतर कंपनीनं अधिक सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवरील मजकूर मर्यादा ओलांडणारा किंवा भडक नसावा यासाठी समाजातून कंपनीवर मोठा दबाव आहे. विशेष म्हणजे यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांच्या फेसबुक पोस्टवरही गंभीर आक्षेप आहेत.

सध्या अमेरिकेत राजकीय ध्रुवीकरणाचा काळ असल्याचं म्हणत युनिलिव्हरनंही फेसबुकवरील जाहिराती बंद केल्यात. तर डव्ह साबण आणि जेरीस आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीनं 2020 या पूर्ण वर्षात फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर जाहिरात देणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सध्याच्या काळात फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या कंपन्यांना जाहिराती देणं लोकांच्या आयुष्यात आणि समाजासाठी हितकारक नसल्याचं कंपनीनं म्हटलंय. जर गरज पडली तर आम्ही या निर्णयाचा पुनर्विचार करु असंही त्यांनी सुचवलंय. दरम्यान शुक्रवारी आपल्या भाषणात फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी हेट स्पीचविरोधात कंपनीनं वेळोवेळी पावलं उचलल्याचं म्हटलंय. त्यासाठी त्यांनी युरोपियन कमिशनच्या रिपोर्टचा हवाला दिलाय. ज्यात गेल्या वर्षी फेसबुकनं 86 टक्के हेट स्पीच आपल्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकल्याचं म्हटलंय.

डॉनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन फेसबुक, ट्विटर आमने-सामने

जॉर्ज फ्लॉईडचा पोलीसी अत्याचारामुळे मृत्यू झाल्यानंतर वर्णद्वेषाविरोधात अमेरिकेत मोठी चळवळ उभी राहिली आहे. तसंच द्वेषपूर्ण तिरस्करणीय मजकूर फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला जात असल्याबद्दलही नाराजी आहे. दरम्यान फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटरनं गेल्या वर्षी जाहिरातीमधून तब्बल 70 बिलियन डॉलरचा महसूल गोळा केलाय.

फेसबुक विरुद्ध ट्विटर माझ्या मते फेसबुक किंवा कोणत्याही इंटरनेट प्लॅटफॉर्मने फॅक्ट चेक करण्या संदर्भात मध्यस्थाची भूमिक घ्यायला हवी. फॅक्ट चेक करणे ही अवघड गोष्ट आहे. लोकशाहित राजकीय भाषण ही संवेदनशील गोष्ट आहे. ती लोकांपर्यंत पोहचायला हवी की त्यांचा राजकीय नेत्याचे मत काय आहे, अशी भूमिका फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने मांडली आहे. मार्कने घेतलेली ही भूमिका डॉनाल्ड ट्रम्प यांच्या जवळ जाणारी आहे. ट्विटरचा निर्णय हा फ्रिडम ऑफ स्पीचच्या विरोधात असल्याचे त्याने म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात ट्विटर आणि फेसबुक विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे.

Coronavirus Update | देशात कोरोना रुग्णसंख्येनं पाच लाखाचा टप्पा ओलांडला

महत्त्वाच्या बातम्या

मुलाला वडिलोपार्जितचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मुलाला वडिलोपार्जितचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
boAt Aavante Bar Prime Soundbars: घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
Best TWS Earbuds: दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
boAt Dual Subwoofer Soundbars: boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock to Watch : शेअर बाजारात 21 सप्टेंबरला मोठ्या घडामोडींची शक्यता, 'या' 5 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, योग्य रणनीतीनं तगड्या कमाईची संधी
शेअर बाजारात मोठ्या घडामोडींची शक्यता, 'या' 5 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, योग्य रणनीतीनं तगड्या कमाईची संधी
Sanjay Jadhav : मनोज जरांगेंच्या भेटीला आलेल्या खासदार संजय जाधव यांना दिशा सालियन प्रकरणी प्रश्न, संजय जाधव उत्तर देत म्हणाले...
मनोज जरांगेंच्या भेटीला आलेल्या खासदार संजय जाधव यांना दिशा सालियन प्रकरणी प्रश्न,उत्तर देत म्हणाले...
SIP Calculator: 1000 रुपयांच्या एसआयपीद्वारे 5 लाखांचा फंड किती वर्षात बनेल? स्टेप अप ठरेल गेमचेंजर, जाणून घ्या समीकरण
1000 रुपयांच्या एसआयपीद्वारे 5 लाखांचा फंड किती वर्षात बनेल? जाणून घ्या समीकरण
'वैभव सूर्यवंशी टीम इंडियाचं भविष्य, पण त्याला प्लेईंग 11 मध्ये..' माजी कॅप्टनकडून कौतुकाची थाप अन् प्रेमाचा सल्लाही दिला!
'वैभव सूर्यवंशी टीम इंडियाचं भविष्य, पण त्याला प्लेईंग 11 मध्ये..' माजी कॅप्टनकडून कौतुकाची थाप अन् प्रेमाचा सल्लाही दिला!
Prakash Raj on CM Vijay: थलापती विजय सीएम होऊन चार महिन्यांचा कालावधी; अभिनेते प्रकाश राज यांच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
थलापती विजय सीएम होऊन चार महिन्यांचा कालावधी; अभिनेते प्रकाश राज यांच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Tata: टाटा ग्रुपमधील वाद कोर्टात जाणार? टाटा ट्रस्टसनं एन.चंद्रशेखरन यांची टाटा सन्समधील नियुक्ती फेटाळली, अभिषेक मनु सिंघवींवर मोठी जबाबदारी
टाटा ग्रुपमधील वाद कोर्टात जाणार, टाटा ट्रस्टसकडून सुप्रीम कोर्टातील वकिलावर मोठी जबाबदारी
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू बेशुद्ध पडला, थेट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर; वडिल पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू बेशुद्ध पडला, थेट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर; वडिल पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार
Embed widget