एक्स्प्लोर
तुमच्या फेसबुक लिस्टमध्ये Mohamed Ali Abdelwahab आहे का?
Mohamed Ali Abdelwahab नावाची फेसबुक प्रोफाईल तुमच्या फेसबुक फ्रेण्ड लिस्टमध्ये असल्यास ताबडतोब डिलीट करा

मुंबई : फेसबुकवर नव्या व्हायरसने घुसखोरी केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. Mohamed Ali Abdelwahab (मोहम्मद अली अब्दलवहाब) नावाची फेसबुक प्रोफाईल तुमच्या मित्रयादीत दिसत असेल, तर फेसबुकला रिपोर्ट करा, असा सल्ला दिला जात आहे. गायिका आनंदी जोशी हिची फेसबुक प्रोफाईल हॅक करण्यात आली आहे. जर तुम्ही आनंदीला फॉलो करत असाल किंवा तिच्या फ्रेण्ड लिस्टमध्ये असाल, तर Mohamed Ali Abdelwahab तुमच्या लिस्टमध्ये दिसेल. आनंदीने फेसबुककडे तक्रार केली असून लवकरच त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला रिपोर्ट/ब्लॉक करण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेष म्हणजे ही प्रोफाईल व्हेरिफाईड (नावापुढील ब्ल्यू टिक) दिसत असल्यामुळे अनेक जण चक्रावले आहेत. या व्यक्तीच्या प्रोफाईलमध्ये इजिप्तचा संदर्भ आढळत आहे.
Before You Go
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















