एक्स्प्लोर
फेसबूक यूजर्सना मिळणार लवकरच नवं फीचर!
मुंबई: सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुक आपल्या अँड्रॉईड अॅप यूजर्ससाठी लवकरच एक नवं फिचर घेऊन येणार आहे. फेसबुक यूजर्ससाठी 'न्यूज सेक्शन'चा समावेश करणार आहे.
न्यूज सेक्शन हा दिसण्यासाठी अगदी फेसबुक पेपर अॅप सारखं असेल. मॅशाबल या वेबसाइटच्या वृत्तानुसार, फेसबुक एका न्यूज सेक्शनच्या शोधात आहेत. सध्या तरी या फीचरबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
मॅशाबलने फेसबूक प्रवक्त्याच्या वतीनं सांगितलं की, लोकांनी आम्हाला सांगितलं की, फेसबुकवर आमच्या आवडीच्या विषयांसह इतर विषयांबद्दलही माहिती मिळवू इच्छितात.
यामुळे यूजर्सना वेगवगळ्या विषयावरील फेसबुक पेज आणि लोकांकडून विविध सूचना मिळू शकतील. रिपोर्टनुसार, गूगल न्यूज आणि ट्विटर यांना टक्कर देण्यासाठी फेसबूक हे नवं फिचर घेऊन येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement