एक्स्प्लोर

Facebook Account : मृत्यूनंतर तुमच्या फेसबुक-इंस्टाग्राम अकाऊंटचं काय होणार? जाणून घ्या...

Facebook Instagram Account After Death : अचानक एखाद्या व्यक्तीचा कार अपघाती किंवा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर त्याचे फेसबुक, इंस्टाग्राम अकाऊंट कोण चालवणार? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Facebook Instagram Account : इंटरनेट (Internet) ही आजच्या काळाची गरज बनली आहे. जर तुम्ही इंटरनेट वापरत नसाल तर याचा अर्थ असा की, तुम्ही जगापासून वंचित आहात. इंटरनेटमुळे सारं जग जवळ आलं आहे. इंटरनेटद्वारे आपल्याया जगभरात घडत असलेल्या घटनांबद्दल माहिती मिळते. शिक्षणापासून मनोरंजन आणि व्यवसायापर्यंत इंटरनेटने सर्वकाही सोपे केले आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये इंटरनेट आहे आणि अनेक सोशल मीडिया ॲप्स आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सप, प्रत्येकजण वेगवेगळे इन्स्टंट मेसेजिंग ॲप वापरतात. या ॲपद्वारे आपण एकमेकांशी जोडलेले राहतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर, त्याच्या सोशल मीडिया अकाउंटचे काय होईल? अचानक एखाद्या व्यक्तीचा कार अपघातात किंवा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर त्याचे फेसबुक, इंस्टाग्राम अकाऊंट कोण चालवणार? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

मृत्यूनंतर तुमच्या फेसबुक-इंस्टाग्राम अकाऊंटचं काय होणार?

सर्च इंजिन गुगलप्रमाणेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही मृत्यूनंतर अकाऊंट हटवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायाची निवड केल्यास मृत्यूनंतर, व्यक्तीचे खाते, प्रोफाइल, पोस्ट इत्यादी सर्व माहिती सर्व्हरवरून हटविली जाते. दुसरीकडे, जर युजरला हे नको असेल तर तो त्याचे अकाऊंट मेमोरियल म्हणून सुरु ठेऊ शकतो आणि ते खाते दुसरी व्यक्ती हाताळू शकते. दरम्यान, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे खाते कोणी चालवू नये असे एखाद्याला वाटत असेल, तर फेसबुक, इंस्टाग्राम तुमचे खाते हटवते. मात्र, यासाठी युजरला आधी काही सेटिंग्ज बदलाव्या लागतील. यासाठी काय प्रक्रिया आहे ते जाणून घ्या.

खाते 'अशा' प्रकारे हटवले जाईल

जर तुम्हाला मृत्यूनंतर तुमचे खाते मेमोरियल म्हणून ठेवायचे नसेल आणि कायमचे हटवायचे असेल तर तुम्हाला आधी एक सेटिंग करावी लागेल. मृत्यूनंतर फेसबुकला दुसऱ्या व्यक्तीला सांगावे लागेल की युजरचा मृत्यू झाला आहे. यानंतर कंपनी त्याचे खाते सर्व्हरवरून शोधते आणि हटवते. मात्र, यासाठी खाते मालकाला अगोदर एक सेटिंग करावी लागेल. वापरकर्त्याला आधी सेटिंगमध्ये जाऊन 'डिलीट आफ्टर डेथ' हा पर्याय निवडावा लागेल.

अशी करा सेटिंग

  • यासाठी तुम्हाला Settings and Privacy सिलेक्ट करावे लागेल.
  • नंतर Access and Control मधून Memorialisation Settings वर जावे लागेल.
  • येथे तुम्हाला डिलीट आफ्टर डेथचा पर्याय मिळेल, जो तुम्हाला निवडून ठेवावा लागेल.

 मेमोरियल अकाऊंटसाठी अशी करा सेटिंग

जर वापरकर्त्याला त्याचे खाते हटवायचे नसेल तर आपण ते मेमोरियल म्हणून देखील ठेवू शकता. यासाठी तुम्हाला फेसबुक पमधील सेटिंग्ज आणि प्रायव्हसीमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला मेमोरिअलायझेशन सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि Choose Legacy Contacts निवडा. येथे  अशी व्यक्ती निवडा जी तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अकाऊंट हाताळेल. तुम्ही तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेली व्यक्तीच निवडू शकता.

Facebook प्रमाणे, Instagram ची प्रक्रिया देखील 90 टक्के सारखी आहे कारण दोन्ही मेटा (Meta) एकाच कंपनीचे प आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget