एक्स्प्लोर
फेसबुकचा मोठा बडगा, 30 हजार बनावट अकाऊंट बंद!

मुंबई: फ्रान्समध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकने तब्बल 30 हजार बनावट अकाऊंट बंद केले आहेत. चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. "अफवा, भ्रम आणि दिशाभूल करणारे बनावट फेसबुक अकाऊंट बंद करण्याला आमचं प्राधान्य आहे. आम्ही सर्वच अकाऊंट सध्या बंद करु शकलो नसलो, तरी आम्ही चांगलं काम करत आहोत" असं फेसबुकने म्हटलं आहे. जे अकाऊंट बंद केले आहेत, ते आमच्या रडारवर होते. ते फेक अर्थात बनावट असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली, असंही स्पष्टीकरण फेसबुकने दिलं आहे. बनावट अकाऊंट बंद केल्यामुळे खोट्या बातम्या, धोकेबाजी आणि राजकीय ट्रोलिंगला आळा बसेल, असंही फेसबुकने म्हटलं आहे. तसंच सध्या फेसबुकचं अशा अकाऊंटवर सातत्याने लक्ष असून, बनावट अकाऊंट बंद करण्याचं मोठं आव्हान आहे. सध्या फ्रान्समध्ये निवडणुकीचा काळ आहे. मात्र या निवडणुकीत अनेक खोट्या बातम्या फेसबुकच्या माध्यमातून पसरत आहेत. त्यामुळेच फेसबुकने हे पाऊल उचललं आहे.
Before You Go
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण

नरेंद्र बंडबे
Opinion





















