एक्स्प्लोर

सीबीएसई-फेसबुकचा करार, विद्यार्थी, शिक्षकांना डिजिटल सुरक्षेचे धडे, आजपासून नोंदणी

फेसबुकने सीबीएसईसोबत (Facebook-CBSE) सामंजस्य करार केला आहे. याच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटायझेशनसह एआर तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : फेसबुक (Facebook) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) सोबत सामंजस्य करार केला आहे. याच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटायझेशनसह एआर (Augmented Reality) तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने विद्यार्थी आणि शिक्षकांना डिजिटल सुरक्षा, ऑनलाईन कार्य आणि ऑग्मेंटेड रिअॅलिटीचं प्रशिक्षण देण्यासाठी फेसबुकसोबत करार केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना ऑनलाईनसाठी येणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेता यावी तसंच प्रशिक्षण घेता यावं यासाठी सीबीएसईनं हा कार्यक्रम राबवला आहे. कोरोनामुळं शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. भविष्यात अशा शिक्षणपद्धतीवर अधिकाधिक जोर दिला जाऊ शकतो. त्यामुळं केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री निशंक यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं आहे की, सीबीएसई आणि फेसबुकच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षा, ऑनलाईन सुरक्षा आणि ऑग्मेंटेड रियलिटीसंबंधी प्रमाणित कार्यक्रम सुरु करण्यासाठी हा करार झाला आहे. आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु आज 6 जुलैपासून 20 जुलैपर्यंत या प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम 10 ऑगस्टपासून तर विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम 6 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. सीबीएसई आणि फेसबुककडून या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन कोर्स पूर्ण करणाऱ्यांना ई-प्रमाणपत्र देणार आहे. या कराराअंतर्गत फेसबुक सीबीएसईला आर्टिफिशयल रिअॅलिटी सुरु करण्यासाठी मदत करणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 हजार शिक्षकांना तर दुसऱ्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षकांनी इथं करावी नोंदणी - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScWbxK4bg72G-6JT6IZ214K5QWk2nXWUiHSNeDtMtTF98FWJA/viewform  विद्यार्थ्यांनी इथं करावी नोंदणी - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf7Pm5mPK5Pji49nIBxGx7kpq7_G50On-p0y51lfDVHLRGoSg/viewform 

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
Embed widget