एक्स्प्लोर

फेसबुकची गंभीर चूक, कर्मचाऱ्यांची माहिती दहशतवाद्यांकडे लीक

मुंबई: लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने मोठी चूक केली आहे. फेसबुकने तांत्रिक बिघाडामुळे चुकून आपल्याच 22 विभागातील सुमारे 1 हजार कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना लीक केली आहे. दहशतवाद्यांचा प्रचार-प्रसार आणि अश्लिल पोस्ट रोखण्यासाठी हे कर्मचारी (मॉडरेटर) काम करतात, मात्र फेसबुक सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या बगमुळे या कर्मचाऱ्यांचीच माहिती लीक झाली. ज्या कर्मचाऱ्याने संशयित दहशतवाद्याला फेसबुकवरुन बॅन केलं, त्याच कर्मचाऱ्यांची माहिती त्या-त्या व्यक्तीला म्हणजेच संशयित दहशतवाद्यांना आणि दहशतवादी संघटनांना पोहोचली. या सर्वप्रकारामुळे भयभीत झालेल्या एका कर्मचाऱ्याने थेट कंपनीलाचा रामराम ठोकला आहे. यापूर्वी आलेला तांत्रिक बिघाड फेसबुकने नोव्हेंबर महिन्यातच दुरुस्त केला होता. मात्र तो बिघाड कायम राहिल्याने हा सर्व प्रकार घडला. सध्या वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि त्याबाबतच्या पोस्टवर नजर ठेवण्यासाठी फेसबुकने खास सुविधा आणली आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दहशवादी, किंवा  भावना भडकवणाऱ्या पोस्ट फेसबुककडून स्वत: डिलीट केल्या जाणार आहेत. त्याबाबतच्या तंत्रज्ञानादरम्यानच फेसबुककडून कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाली. दरम्यान, फेसबुकनेही अशी चूक झाल्याचं मान्य केलं. यापुढे असा प्रकार टाळण्यासाठी तांत्रिक बदल करु, असं स्पष्टीकरण फेसबुकने दिलं. माहिती लीक झालेल्या एका कर्मचाऱ्याने घाबरुन नोकरीलाच रामराम केला आहे. ज्या संशयित दहशतवाद्याला फेसबुकवरुन बॅन केलं, तो आपला शोध घेईल, अशी भीती या कर्मचाऱ्याला आहे. "जेव्हा तुम्ही युद्धजन्य क्षेत्रात असाल आणि संबंधित दहशतवाद्यांना किंवा त्यांच्या संघटनांना तुमची, तुमच्या कुटुंबाची माहिती मिळाली असेल, तर ते गप्प बसतील का" अशी चिंत या कर्मचाऱ्याने व्यक्त केली. दरम्यान, फेसबुकने संबंधित कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Embed widget