एक्स्प्लोर

फेसबुकला झटका, टेस्ला, स्पेस एक्स पेज डिलीट!

अमेरिकन उद्योजक इलॉन मस्क यांनी त्यांच्या स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपन्यांचे लाखो लाईक्स असलेले फेसबुक पेज डिलीट केले आहेत.

नवी दिल्ली: केम्ब्रिज अनालिटिका डेटा स्कँडलमुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या फेसबुकला आणखी एक धक्का बसला आहे. अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांनी त्यांच्या स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपन्यांचे लाखो लाईक्स असलेले फेसबुक पेज डिलीट केले आहेत.  टेस्ला ही इलेक्ट्रीक कार तयार करणारी नामांकित कंपनी आहे. एलन मस्क यांना फेसबुक पेज डिलीट करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि स्पेक्स एक्स, टेस्ला ही पेजस डिलीट केली. तुमची खासगी माहिती फेसबुक कसं चोरतं आणि कुणाला देतं? यापूर्वी व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनीही फेसबुक डिलीट करण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर एलन मस्क यांनी थेट कृती केल्याने, हळूहळू फेसबुक आपला विश्वास गमावत आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. SpaceX  या फेसबुक पेजला जवळपास 26 लाख लाईक्स होते, तर Tesla फेसबुक पेजलाही जवळपास तितकेच म्हणजेच 24 लाख लाईक्स होते. फेसबुक लीक : भारतातील कुठल्या पक्षाचे हात दगडाखाली? लाईक्सची एव्हढी मोठी संख्या असणारी ही दोन पेज आता लॉगआऊट करण्यात आली आहेत. मात्र एलन मस्क यांचं वैयक्तिक मात्र अनधिकृत पेज अजूनही सुरु असल्याचं दिसतं. त्यांच्या नावे अनेक फेसबुक पेज आहेत, त्यातील अनेक बनावटही आहेत. दरम्यान, सध्या ट्विटरवर #deletefacebook हा ट्रेण्ड सुरु आहे. त्यामध्ये व्हॉट्सअॅपच्या सहसंस्थापकानंतर आता टेस्लाच्या सीईओंनी सहभाग नोंदवला आहे. काय आहे फेसबुक डेटा लीक प्रकरण? 2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला, असाही आरोप आहे. ब्रिटनस्थित केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कशाप्रकारे मदत केली, यासंदर्भात अमेरिकन आणि युरोपियन खासदारांनी 'फेसबुक इंक'कडे उत्तर मागितले आहे. एकंदरीत फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’ डेटा घाटोळ्यानंतर लाखो युझर्सनी फेसबुकला रामराम ठोकला आहे. चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे. अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून लीक झाली होती. या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही. याचा परिणाम फेसबुक युजर्सच्या संख्येवर होताना दिसत आहे. सोमवारी फेसबुकच्या संपत्तीत 37 अब्ज डॉलरची घट झाली. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनाही 6.6 अब्ज डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं आहे. अमेरिका आणि युरोपमधल्या काही देशांत फेसबुकची चौकशीही सुरू आहे. संबंधित बातम्या आमची चूक झाली, मार्क झुकरबर्गचा माफीनामा  फेसबुक लीक : भारतातील कुठल्या पक्षाचे हात दगडाखाली?

'डेटा चोर काँग्रेस'... फेसबुकच्या डेटा लीकचे भारतात पडसाद डेटा लीक प्रकरणानंतर फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’ फेसबुकला दणका, एका दिवसात 395 अब्ज रुपयांचं नुकसान

वेळ आलीय, फेसबुक डिलीट करा : व्हॉट्सअॅप सहसंस्थापक  तुमची खासगी माहिती फेसबुक कसं चोरतं आणि कुणाला देतं?  

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget