एक्स्प्लोर

माझा महाराष्ट्र #डिजिटलमहाराष्ट्र

Digital Maharashtra : यंदाच्या 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' या चर्चासत्रात डिजिटल एन्टरटेन्मेंट, डिजिटल एज्युकेशन, डिजिटल फ्यूचर आणि चॅलेंजेस ऑफ फेक न्यूज या विषयांवर संबंधित क्षेत्रातील दिग्गज आपलं मत मांडतील.

मुंबई : सध्याच्या काळात डिजिटल तंत्रज्ञान हे जीवनाचा अविभाज्य भाग झालं आहे. डिजिटलायझेशनमुळे सामान्य व्यक्तींच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा धांडोळा घेण्यासाठी 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यंदा या कार्यक्रमाचं चौथं वर्ष आहे. राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एबीपी माझाच्या 'ब्लॉग माझा स्पर्धा 2018' चा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर आणि 'अक्षरनामा'चे संपादक राम जगताप यांनी काम पाहिलं. वाचा : एबीपी माझा आयोजित #ब्लॉगमाझा 2018 स्पर्धेचा निकाल यंदाच्या 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' या चर्चासत्रात डिजिटल एन्टरटेन्मेंट, डिजिटल एज्युकेशन, डिजिटल फ्यूचर आणि चॅलेंजेस ऑफ फेक न्यूज या विषयांवर संबंधित क्षेत्रातील दिग्गज आपलं मत मांडतील. महाराष्ट्राला डिजिटल तंत्रज्ञानाने सक्षम राज्य बनवण्यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत, त्याचा आढावा या कार्यक्रमात घेतला आहे. डिजिटल एन्टरटेन्मेंट डिजिटल एन्टरटेन्मेंट विषयावर नितीन पवार (गावाकडच्या गोष्टी वेब सीरिजचे दिग्दर्शक), अमेय वाघ (अभिनेता) आणि निपुण धर्माधिकारी (अभिनेता, दिग्दर्शक) हे चर्चा करतील. तर  सौमित्र पोटे (एन्टरटेन्मेंट हेड, एबीपी माझा) हे या सत्राचे चर्चा समन्वयक असतील आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचा काळ असेल. डिजिटल एज्युकेशन डिजिटल एज्युकेशन विषयावर अनिल सोनूने (शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, औरंगाबाद), दीपाली सावंत (जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, वर्धा), रणजीत दिसले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, कदमवस्ती,  ता माढा, जिल्हा सोलापूर) आणि भाऊसाहेब चास्कर (हंगामी शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, अकोले, अहमदनगर) हे आपलं मत मांडतील. या सत्राचे चर्चा समन्वयक हर्षल विभांडिक (इन्वेस्टमेंट बँकर, इंटरनॅशनल कॅपिटल पार्टनर्स) असतील. डिजिटल फ्यूचर या विषयावर मानस गजरे (संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, झबुझा लॅब्ज, मोबाईल अॅप मेकिंग अँड मेकिंग कंपनी) आणि दीपक घैसास (अर्थतज्ज्ञ आणि उद्योजक) चर्चा करणार आहेत. तर शेखर पाटील (पत्रकार आणि टेकवार्ताचे संपादक) हे या सत्राचे चर्चा समन्वयक असतील. चॅलेंजेस ऑफ फेक न्यूज तर चॅलेंजेस ऑफ फेक न्यूज हे या कार्यक्रमाचं शेवटचं सत्र असेल. ब्रिजेश सिंह (महासंचालक, माहिती आणि प्रसार), निवेदिता निरंजन कुमार (फॅक्ट चेक, बुम लाईव्ह), प्रशांत माळी (वकील) आणि आनंद मांगले (संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते) हे आपल्या चर्चासत्रात चॅलेंजेस ऑफ फेक न्यूजबाबत माहिती देतील.  एबीपी माझाचे मेघराज पाटील या सत्राचे चर्चा समन्वयक आहेत. 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र'च्या 2017 च्या चर्चासत्रात ई-मनी, ई-शिक्षण, ई-आरोग्य आणि सोशल मीडिया या विषयांवर संबंधित क्षेत्रातील दिग्गजांनी मत मांडलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Embed widget