एक्स्प्लोर
डॅटसनच्या रेडी-गो कारचं गोल्ड एडिशन लाँच
डॅटसनच्या या नव्या कारची ह्युंदाईच्या EON आणि मारुती सुझुकीच्या अल्टो 800 या कारशी स्पर्धा असणार आहे.

मुंबई : डॅटसननं आपल्या हॅचबॅक रेडी-गो या कारचं गोल्ड एडिशन लाँच केलं आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा गोल्ड एडिशन 15,000 ते 18,000 रुपयांनी महाग असणार आहे. या कारच्या डिझाइन आणि फीचरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. डॅटसनच्या या नव्या कारची ह्युंदाईच्या EON आणि मारुती सुझुकीच्या अल्टो 800 या कारशी स्पर्धा असणार आहे.
रेडी-गो गोल्ड एडिशनचे खास फीचर : - कार बॉडीवर गोल्ड ग्राफिक्स - ग्रिल आणि व्हील कव्हरवर गोल्ड फिनिशिंग - व्हाईट, सिल्वर आणि ब्रोंज ग्रे कलरमध्ये उपलब्ध - ब्लॅक आणि गोल्ड लेदर सीट कव्हर - ब्ल्यूटूथ इनेबल म्युझिक सिस्टम - रिअर पार्किंग सेंसर
या कारमध्ये 1.0 लीटर इंजिन देण्यात आलं असून याची पॉवर 68 पीएस आणि टॉर्क 91 एनएम आहे . यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. बातमी सौजन्य : cardekho.com
रेडी-गो गोल्ड एडिशनचे खास फीचर : - कार बॉडीवर गोल्ड ग्राफिक्स - ग्रिल आणि व्हील कव्हरवर गोल्ड फिनिशिंग - व्हाईट, सिल्वर आणि ब्रोंज ग्रे कलरमध्ये उपलब्ध - ब्लॅक आणि गोल्ड लेदर सीट कव्हर - ब्ल्यूटूथ इनेबल म्युझिक सिस्टम - रिअर पार्किंग सेंसर
या कारमध्ये 1.0 लीटर इंजिन देण्यात आलं असून याची पॉवर 68 पीएस आणि टॉर्क 91 एनएम आहे . यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. बातमी सौजन्य : cardekho.com आणखी वाचा