एक्स्प्लोर
रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 4G फोन आज ग्राहकांच्या हाती
जिओने 153 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड 4G डेटा मिळणार आहे.
![रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 4G फोन आज ग्राहकांच्या हाती Customers To Get Reliance Jio Cheapest Phone Today Latest Update रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 4G फोन आज ग्राहकांच्या हाती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/26204104/jio-phone-73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतातला सर्वात स्वस्त 4G मोबाईल आज ग्राहकांच्या हाती पडणार आहे. ज्या ग्राहकांनी दीड हजार रुपयांचं डिपॉझिट भरुन मोबाईलचं आधी बुकिंग केलं होतं, त्यांना आज मोबाईल मिळण्याची शक्यता आहे.
मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. केवळ 1500 रुपये अनामत रक्कम भरल्यानंतर रिलायन्सकडून हा मोबाईल दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, हे पैसे तीन वर्षांनंतर त्या ग्राहकाला परत देण्याचं आश्वासनही कंपनीतर्फे देण्यात आलं आहे. म्हणजेच हा 4G फोन अगदी मोफत मिळणार आहे.
जिओने 153 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड 4G डेटा मिळणार आहे. व्हॉईस कॉलिंग, व्हॉईस मेसेज, व्हिडिओ कॉलिंग, इयरफोनशिवाय एफएम ऐकण्याची सुविधा या फोनमध्ये आहे. जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे.
हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल. 512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, 2000mAh क्षमतेची बॅटरी, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.
संबंधित बातमी :
जिओ फोन कसा आहे?
‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस
भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!
रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)