एक्स्प्लोर

अॅपल, मायक्रोमॅक्स आणि लेनोव्होचे फोन महागणार

केंद्र सरकारने मोबाईल फोनसोबतच टीव्हीवरील आयात शुल्क वाढवलं आहे. ओव्हन आणि वॉटर हिटरवरही याच प्रकारे वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : मोबाईल फोनमध्ये आयफोनचे बरेच मॉडेल महागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मोबाईल फोनसोबतच टीव्हीवरील आयात शुल्क वाढवलं आहे. ओव्हन आणि वॉटर हिटरवरही याच प्रकारे वाढ करण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाने अधिसूचना जारी करत याबाबत माहिती दिली आहे. मोबाईलवर असलेलं आयात शुल्क 10 टक्क्यांहून 15 टक्के करण्यात आलं आहे. हे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे आता मोबाईल खरेदी करताना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. मोबाईल मार्केट क्षेत्रातील संस्था काऊंटरपॉईंटच्या आकडेवारीनुसार, 2017 मध्ये 28 कोटी मोबाईल हँडसेट विकण्याची शक्यता आहे. यापैकी 80 टक्के फोन मेक इन इंडिया आहेत, तर उर्वरित 20 टक्के फोन इतर देशांमधून आयात केलेले आहेत. आयात होणाऱ्या फोनमध्ये अॅपल, मायक्रोमॅक्स आणि लेनोव्होच्या जास्त फोनचा समावेश आहे. अॅपलचे भारतात विकले जाणारे जवळपास 88 टक्के फोन आयात केले जातात. त्यामुळे अॅपलला एकतर किंमत वाढवावी लागेल, किंवा भारतातच निर्मिती सुरु करावी लागेल. मायक्रोमॅक्स आणि लेनोव्होने भारतात फोन निर्मिती करण्याची तयारी पूर्ण तर केलेली आहे, मात्र प्रत्यक्षात काम सुरु झालेलं नाही. त्यामुळे आता या नव्या निर्णयानंतर दोन्ही कंपन्या उत्पादन सुरु करतील, अशी अपेक्षा आहे. मोबाईल क्षेत्रामध्ये सध्या सॅमसंगचा दबदबा आहे. सॅमसंगचे सर्व मोबाईल भारतातच तयार होतात. देशात सध्या 50 कोटी मोबाईल तयार होतात. तीन वर्षांपूर्वी हा आकडा 25 कोटी एवढा होता. टीव्ही महागणार टीव्ही मार्केटमध्ये सॅमसंग, एलजी आणि सोनीचा दबदबा आहे. मात्र सॅमसंग आणि एलजीवर या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही. कारण या कंपन्यांची सर्व टीव्ही सेट इथेच तयार होतात. सोनीचे टीव्ही आयात होतात, त्यामुळे यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. देशात सध्या वर्षाला 90 लाख टीव्ही सेटची विक्री होते. दरम्यान या निर्णयावर इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Embed widget