एक्स्प्लोर
सॅमसंग गॅलक्सी नोट 8 स्मार्टफोनवर बंपर कॅशबॅक ऑफर
अमेझॉन इंडियाने सॅमसंगच्या प्रीमियम डिव्हाइस नोट 8 वर बंपर कॅशबॅक ऑफर दिली आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 8000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे.
मुंबई : अमेझॉन इंडियाने सॅमसंगच्या प्रीमियम डिव्हाइस नोट 8 वर बंपर कॅशबॅक ऑफर दिली आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 8000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. ही कॅशबॅक ऑफर फक्त गॅलक्सी नोटवरच आहे.
ही कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांना अॅमेझॉन पे वॉलेटमधून पेमेंट करावं लागणार आहे. जर ग्राहकाने कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट मोड निवडला तर त्याला ही ऑफर मिळणार नाही.
अमेझॉनच्या या ऑफरमध्ये कॅशबॅक 72 तासांमध्ये ग्राहकाला मिळेल. जे ग्राहक हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करेल त्याना 20 दिवसांमध्ये कॅशबॅक मिळेल.
प्रीमियम डिव्हाइस नोट 8 चे फीचर
या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच सुपर एमोलेड 2960x1440 पिक्सल डिस्प्ले देण्यात आलं आहे. तसंच हा फोन वॉटरप्रुफ आणि डस्ट रेसिस्टेंट आहे. यामध्ये 6 जीबी रॅमसह क्लॉककॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर देण्यात आलं आहे.
यामध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement