एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिओपेक्षाही बीएसएनएल ग्राहकांना देणार स्वस्त प्लान!
मुंबई: रिलायन्सची स्वस्त मोबाइल सेवा जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने कंबर कसली आहे. स्वस्त मोबाइल सेवा देण्यासाठी बीएसएनएल आपल्या टेरिफमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. बीएसएनएलनं हा निर्णय घेतल्यास स्वस्त कॉल दरांसाठी कंपन्यांमध्ये नवी स्पर्धा सुरु होईल.
बीएसएएल आणणार आपल्या ग्राहकांसाठी फ्री व्हॉईस कॉल
रिलायन्स जिओच्या पावलावर पाऊल ठेऊन बीएसएनएल आपल्या ग्राहकांना फ्री व्हॉईस कॉल सेवा देण्याच्या तयारीत आहे. बीएसएनएल आपली ही प्रस्तावित सेवा 2जी आणि 3जी ग्राहकांनाही देणार आहे. ज्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओची सेवा फक्त 4जी यूजर्ससाठी असणार आहे.
लॅण्डलाईनधारकांनाही खुशखबर
बीएसएनएलचे मॅनेजिंग डायरेक्टर अनुप श्रीवास्तव यांचं म्हणणं आहे की, बीएसएनएल जिओपेक्षाही स्वस्त सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे. नव्या वर्षी फ्रेश ऑफरसोबत लाईफ टाइम फ्री व्हॉईस कॉल सेवा देण्याची तयारी सुरु आहे. रिलायन्स जिओची एंट्री शुल्क 149 रु. आहे. त्यापेक्षाही कमी किंमतीत व्हॉईस टेरिफची सुरुवात केली जाणार आहे. ही सुविधा बीएसएनएल लॅण्डलाईन धारकांनाही मिळणार आहे.
टेलिकॉम बाजारात नवी स्पर्धा
बीएसएनएलच्या स्वस्त कॉल दरांमुळे एअरटेल, व्होडाफोन, एअरसेल आणि आयडिया यासारख्या दूरसंचार कंपन्यांवर कॉल दर कमी करण्यासाठी नक्कीच दबाव वाढेल. त्यामुळे येत्या काळात टेलिकॉम बाजारात एक नवी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
ग्राहकांना स्वस्त सेवा देणं हे बीएसएनएलसारख्या तोट्यात असणाऱ्या कंपनीसमोर एक आव्हान असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement